तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 March 2019

महिला सुसंस्कृत समाजनिर्मितीची खरी शिल्पकार....ब्रह्माकुमारी ज्योती दिदि

ब्रह्माकुमारिज विद्यालयात महिला दिन साजरा

 रिसोड महेंद्रकुमार महाजन :- 

 प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विश्व विद्यालयात 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारिज विद्यालय रिसोड च्या संचालीका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदि,प्रमुख अतिथी विजयमाला आसनकर नगराध्यक्षा न.प रिसोड,प्रसिद्ध विधितज्ञ नुतनजी भराड,उषाताई हाडे तालुकाअध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड,
निर्मलाजी तोतला ता.अध्यक्ष महेश्वरी महिला मंडळ,ब्रह्माकुमारी गिता दिदि,ब्रह्माकुमारी वंदना दिदि,ब्रह्माकुमारी वर्षा दिदि इत्यादी मान्यवर उपस्थीत होते. सुरुवातीला दीप प्रज्वलन करुन सर्व मान्यवर महिलांचे ज्योती दिदिंनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कु आर्या सारोळकर हिने स्वागत नूत्य केले ,गिता दिदिनी विद्यालयाचा परिचय देत प्रस्तावना केली. ब्रह्माकुमारी ज्योती दिदिनी मार्गदर्शन करताना महिलांमध्ये असणारा  आत्मविश्वास,सहनशीलता,जबाबदारी,समर्पण,धैर्य,विश्वास,विनम्रता,विनयशिलता,वतस्ल्य,भावनिकाता इत्यादी गुणाची महिमा स्पष्ट केली. महिला दिन हा महिलांच्या आत्मसन्मान वाढविणारा दिवस आहे.महिला सुसंस्कृत समाजनिर्मितीची खरी शिल्पकार आहे.स्त्रीविना या सृष्टीची कल्पनाच अधुरी आहे.
ब्रह्माकुमारिज विद्यालयाची जबाबदारी 80वर्षापूर्वीच महिलांवर निश्चित करुन इश्वरिय ज्ञानदान करुन विश्व परिवर्तन करण्याची संधी उपलब्ध केली आहे.कोणतेही क्षेत्र असो महिला नेहमीच आपले सर्वस्व पणाला लावुन ती जबाबदारी पुर्ण करित आहेत.
महिलानी ब्रह्माकुमारिज विद्यालयातून निशुल्क दिले जाणारे राजयोगचे ज्ञान माहिती करुन घेण्यासाठी सात दिवसाचा प्रत्येक दिवशी एक तास याप्रमाणे सात दिवस कोर्स पुर्ण करुन सकारात्मक,सुखी,आनंदी जिवन व्यतित करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
प्रख्यात विधितज्ञ नुतनजी भराड यानी   महिलांना जीवनातील समस्यांना सामोरे जाताना कायद्याचे प्रार्थमिक    स्वरुपाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.बरयाच वेळा महिलांना दुय्यम,तुच्छ,हीन वागणूक दिली जाते तिचा आत्मसन्मान दुखावला जातो किंवा तिला अधिकारापासुन वंचित ठेवल्या जाते परंतू कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे तिला अधिकार व हक्क मिळविता येत नाहीत.भारतिय राज्यघटनेने महिलांच्या सक्षमीकरनाकरीता अनेक कायद्याचे संरक्षण दिले आहे.महिलानी  स्वकर्तुत्व,स्वावलंबन,यातुन स्वउन्नती सधावी व अध्यात्म व संस्कृतीची जोपासना करावी.नगराध्यक्षा सौ असनकर यानी अध्यात्म आणी भक्ती याबद्दल विवेचन केले अध्यात्म्या ला ज्ञानाची बैठक असते तर भक्तिला श्रद्धेचे आच्छादन असते.ब्रह्माकुमारिज विद्यालयातून दिले जाणारे ज्ञान हे मनुष्यच्या वैयक्तीक जीवनात परिवर्तन करुन कल्याणकारी दैवी  गुणांचा अंगीकार होण्यास उपयुक्त आहे त्यानी भविष्यात या ज्ञानाला आत्मसात करुन इश्वरियसेवा करण्याचा मानस व्यक्त केला.जिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्षा उषाताई हाडे यानी विद्यालयाच्या शिस्तीची व ज्योती दिदिंच्या आदर्शवत  नियोजनाची भरभरुन स्तुति केली.विद्यालयाची महिलांप्रती असणारी सन्मानाची वागणूक ही महिलांच्या जीवनात सकारात्मक विचार निर्माण करण्यास प्रवृत्त करणारी बाब आहे.तर निर्मला तोतला यानी इश्वरिय सेवेमध्ये ज्योती दिदिना महेश्वरी महिला मंडळाच्या वतीने सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.
 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ब्रह्माकुमारी वर्षा दिदिनी तर आभार अपर्णा बहन नी मानले.कार्यक्रमाला विद्यालयाच्या ज्ञानार्थी सह बहुसंख्य शहरातिल महिला उपस्थीत होत्या.

महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 
9960292121
9420352121

No comments:

Post a Comment