तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

मरडसगाव ग्रामस्थांचे गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलनप्रतिनिधी
पाथरी:-वारंवार पाठपुरावा करून  ही दत्तक बँक देत नसल्याने मरडसगांवच्या ग्रामस्थांनी मंगळवारी ढालेगाव बंधा-याच्या  बँक वाटर मध्ये गोदावरी नदी पात्रात सामुहीक जलसमाधी आंदोलन केले.
यासाठी मागिल काही महिण्या पासुन मरडसगाव ग्रामस्थ दत्तक बँक देण्यात यावी या साठी प्रशासना कडे वारंवार निवेदने देऊन ही कार्यवाही होत नसल्याने  मंगळवार ५ मार्च रोजी दुपारी बारा वाजता मरसगावचे ग्रामस्थ नदी पात्रात उतरले या वेळी येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र बँक दत्तक म्हणून घेईल न घेतल्यास जिल्हाधिकारी यांच्या सोबत ग्रामस्थांची बैठक करून तोडगा काढला जाईल असे आश्वासन या आंदोलकांना तहसिल प्रशासनाच्या अधिका-यांनी दिल्या नंतर हे आंदेलन मागे घेण्यात आले या वेळी आंदेलन स्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

No comments:

Post a Comment