तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाद्वारे जागतिक महिला दिन साजरा ।


जिंतूर - महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आज सकाळी 11 वा. जागतिक महिला दिनानिमित्त ' कळी - उमलतांना ' या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले यात  153 मुलींची उपस्थिती होती   .
    या कार्यक्रमात परभणी येथील महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनच्या जिल्हा उपाध्यक्ष डॉ . दिपाली सुधीर काकडे मॅडम यांनी  किशोरावस्थेतील मुलींना ' कळी -  उमलतांना ' या विषयावर उत्कृष्ट  मार्गदर्शन केले , त्यांनी मुलींना वयात येताना त्यांच्या शरीरात होणारे बदल , तसेच आजच्या धावत्या  युगात मोबाईल , टी . व्हि. या बाबींकडे लक्ष न देता मुलींनी स्वतः ची शारीरिक व मानसिक  स्वास्थ प्राकृत अवस्थेत ठेवण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योग्य लोह युक्त फळे , पाले भाज्यांचा नित्यजेवणात वापर , विहारात रोज योग व प्राणायाम  नित्य जीवनात सातत्याने करण्यास सांगितले , त्यामुळे शरीर सदृढ होऊन मनाची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढुन 
परीक्षेत चांगल्या गुणवत्तेने विद्यार्थीनी पास होऊन भावी जीवनात उज्वल , यशस्वी होतील .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार श्री राजाभाऊ नगरकर , मीडिया न्युज चे श्री सचिन रायपत्रीवर व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे जिल्हा अध्यक्ष डॉ . शिवप्रसाद दत्तराव सानप होते तसेच प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका सौ . रेवती माणिक राऊत मॅडम होत्या .
या कार्यक्रमाची सुरवात भगवान श्री धन्वंतरी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने आणि स्वागत गीताने झाली.
     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . मनीष सावळे सर व प्रस्तावना डॉ .शिवप्रसाद सानप यांनी तसेच आभार  सौ . रेवता राऊत मॅडम यांनी आणि कु .रुपाली वाघमारे या विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन रायपत्रीवार , रमाकांत सानप , एस . एस . पाटील मॅडम  इतर शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी बहुमूल्य सहकार्य केले .

No comments:

Post a Comment