तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 March 2019

विम्या साठी पाथरी तालुक्यात पुन्हा एका गावाचा लोकसभा मतदानावर बहिष्कार;ग्रा पं ने घेतला ठराव;पाथरी तहसिलदारांना निवेदन

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-तालुका सर्वत्र दुष्काळात होरपळत आहे.कमी पावसा मुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हातची गेल्याने जगाचा पोशिंदा अर्थिक संकटात असून या वेळी किमान विमा तरी मिळेल अशी भाबडी आशा बळीराजाला होती मात्र या ठिकाणी ही नेमकी तोंडाला पाने पुसली गेल्याने आता शेतकरी वर्ग संतप्त होत असून स्वयं प्रेरणेने आता नाही तर पुन्हा कधी नाही अशा निर्णया पर्यंत पोहचत असून कान्सूर ग्रामस्थांच्या मतदाना वरील बहिष्काराच्या निर्णया नंतर  बुधवारी आंधापुरी येथिल ग्रा पं ने मासिक सभेत ठराव घेऊन लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजुर करत पाथरी तहसिलदारांना निवेदन दिले.
हक्का साठी संघर्ष हा करावाच लागतो त्यात शेतकरी बांधवांचा वापर सर्वांनी वेळोवेळी स्वार्था साठी केल्याची भावना आता शेतकरी ओळखू लागले आहेत.या विषयी ते उघडपणे बोलून ही दाखवत आहेत.आमचे जाणिव पुर्वक नुकसान करत जर आम्हाला झुलवत ठेवायचे असेल तर मग या लोकशाहीतील निर्णय प्रकीयेत निवडणूकीत कशा साठी सहभागी व्हायचे असा प्रतिप्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.बाभळगाव मंडळातील कान्सूर गावाने खरीप २०१८चा विमा न देल्या ने निवडणुक मतदान प्रक्रियेवर सोमवारी बहिष्काराचे निवेदन दिल्या नंतर बुधवार २० मार्च रोजी अंधापुरी येथिल शेतक-यां सह ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव घेतला.कान्सुर च्या ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णया नंतर आता अंधापुरी ग्रामस्थांनी तोच निर्णय घेतला असून शेतकरी स्वयंस्फूर्तीने आंदोलनाचे हत्यार बाहेर काढत असून.या मुळे प्रशासनाची चांगलीच गोची झाली असल्याचे दिसून येत आहे. या निवेदनावर गणेश कोष्टे, अंचित कोल्हे, हनुमान कोष्टे, इंद्रजित महाडिक, रामेश्वर मेरे, परमेश्वर मोरे, नाबदाराम मोरे, पवन कोल्हे, दिलिप कोल्हे, महेश कोल्हे, अक्षय केल्हे, विठ्ठल महाडीक, आश्रेबा पवार  दौलत बिटे रामकिशन बिटे गोविंद सोनटक्के, भिमराव बिटे इंद्रावती बिटे कैलास बिटे भागवत बिटे धर्मराज केल्हे, बालासाहेब कोल्हे, आनंद शिंदे आदिंच्या स्वाक्ष-या  आहेत

1 comment:

 1. मंडळनिहाय प्रतिहेक्टरी मंजूर विमा परतावा
  सोयाबीन ः परभणी, पेडगाव, जांब (१ हजार ५१२ रुपये), सेलू, वालूर, कुपटा, चिकलठाणा बु. देऊळगाव गात (१ हजार ६६ रुपये), मानवत, केकरजवळा, कोल्हा (१४ हजार ४९८ रुपये),
  मूग ः बामणी ( २ हजार ८५४ रुपये), चिकलठाणा बु. (२ हजार ९०५ रुपये),मानवत (५ हजार ५१२ रुपये), पूर्णा (५७२ रुपये), कात्नेश्वर (८६० रुपये).
  उडीद ः चिकलठाणा बु. (६८० रुपये), 
  ज्वारी ः माखणी (८ हजार ८०८ रुपये)                    
  बाजरी ः हदगाव बु. (३ हजार ४०० रुपये)

  ReplyDelete