तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

परळी नगर परिषदेकडून शहर समृध्दी उस्तव अंंतर्गत बचत गट महिला आरोग्य तपासणी शिबीर आणि महिला मेळावा संपन्न


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी नगर परिषद अणि महिला आर्थीक विकास महामंडळ, बीड यांच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्री नागरी उपजिवीका अभियानच्या वतीने आज दि.07 मार्च 2019 गुरुवार रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेस सामाजिक अभिमरण आणि संस्थापक बांधी या घटकांतर्गत शहर समृध्दी उस्तव अंतर्गत बचत गट महिला आरोग्य तपासणी शिीबीर आणि महिला मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रथम नागरिक नगरध्यक्षा सौ. सरोजनीताई सोमनाथ हालगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरायध्यक्ष व  नगरसेवक बाजीराव भौय्या धर्माधिकारी, माजी नगरायध्यक्ष नगरसेवक दिपक नाना देशमुख, शिक्षण सभापती संजय फड, आणि डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मधुसुदन काळे, सचिव डॉ. अयज मुंडे, डॉ. शालीनीताई कराड, डॉ. ढाकणे म्ॉडम, डॉ. माया समशेट्टे, डॉ. टिंबे, डॉ. सुवर्णा टिंबेर, डॉ. सिध्देश्वर फड, डॉ. जाधव सरकारी सेवा, डॉ. फड, डॉ. देशमुख, कार्यालयीन अधिक्षक दिलीप रोडे, किरण उफाडे, घाटे एस. व्ही, डहाळे, बाळु, शरनम, दिनदयाळ व्यवस्थापक खेबाले सतीश, विना नेहरकर, इत्यादी उपस्थित होते. 
प्रथम नागरिक नगरायध्यक्षा सौ. सरोजनीताई सोमनाथअप्पा हालगे यांचे सत्कार विना नेहरकर यांनी केले. व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन पुजन करण्यात आले. यावेळी डॉ. मधुसुदन काळे यांनी स्त्रीयांच्या समस्या बाबत काळजी व निगा या संबंधी माहिती अदली. यानंतर डॉ. शालीनीताई कराड यांनी महिलांचा सन्मान करुन मुलीचा जन्म वाढवला पाहिजे असे प्रतिपादन व्यक्त केले. डॉ. टिंबे यांनी महिलांना या मेळाव्यात तपासणी करुन पुढील संदर्भ सेवा ह्या औषधी मध्ये 30 टक्के सूट देवून मदत केली जाईल असे सुचित केले. तसेच उपस्थित डॉक्टरांकडून महिलांना तपासणीसाठी सेवा देण्यात आली व एकूण 360 महिलांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना उपलब्ध औषधी व गोळ्या देण्यात आले. यानंतर महिलांना आरोग्य सेवा सरकारी बाबत डॉ. जाधव आणि डॉ. फड यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी बी.पी, सुगर व रक्त तपासणी नियमित करुन घ्यावे असे सुचित केले.
महिला आरोग्य मेळावा साजरा करण्यासाठी नगर परिषदेतील रोडे साहेब, किरण उफाडे, घाटे व्यवस्थापक खेबाले सतीश, व्यवस्थापक विना नेहरकर, डहाळे बाळु आदिंनी परिश्रम घेतले. तर बचत गटाच्या आणि वस्ती स्तर संस्थेच्या अंबिका तुलदेश परदेशी, संगीता, विजयमाला मोदानी, आणि शहर स्तर संस्थेच्या महिलांनी उस्फुर्त भाग घेवून सहकय्र केले. सहयोगीनी विशाखा घाटगे, आणि सीएमआसीच्या मीना कांबळे, नव्हाडे मामा, आबेद भाई, सोनाजी कुंभार, विकास गोविंद भाऊ इत्यादींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक खेबाले सतीश यांनी केले. या कार्यक्रमात साधारण 700 महिलांनी सहभाग नोंदवला.

No comments:

Post a Comment