तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 March 2019

जीवनात पहिली महिला आईच्या रुपानेच येते - प्रा. वर्षा क्षीरसागरसुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १० ( प्रतिनिधी ) प्रत्येकाच्या जीवनात पहिली महिला आईच्या रुपानेच येते, तीच पहिली गुरु असते, तिच आपल्याला उभा करणारी माता असते, त्यामुळे प्रत्येकाने आईचा आदर करावा असे आवाहन प्रा. वर्षा क्षीरसागर यांनी केले.
        गेवराई शहरातील न्यू. ईरा स्कूल मध्ये महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गणेश क्षीरसागर हे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. वर्षा क्षीरसागर, दिपाली जोशी, प्रेमाला कुलकर्णी, ज्योती तांदळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना प्रा. वर्षा  क्षीरसागर म्हणाले की, सध्या महिलेवर मोठी जबाबदारी आली आहे.  आपले मूल सुसंस्कारित घडले पाहिजे, त्यांचे चांगले शिक्षण झाले पाहिजे, या प्रमुख जबाबदारी शिवाय पत्नी, सून, मुलगी अशा अनेक जबाबदाऱ्या महिलांना सांभाळाव्या लागतात. घरातील सर्व नाते सांभाळून बाहेर पुरुषाच्या बरोबरीने महिलांंना सक्षमपणे काम करावे लागत आहे. महिलेचे आयुष्य पुरुषापेक्षाही जास्त कष्टाचे झाले आहे. महिला घरातील व बाहेरील जबाबदारी सक्षमपणे निभावत असल्याचे सांगून प्रा. क्षीरसागर पुढे म्हणाल्या की, आई प्रत्येकाच्या जिवनातील पहिली गुरु आहे, तिचा प्रत्येकाने आदर करावा असेही त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी दिपाली जोशी यांनी महिला कशा प्रकारे आपली सक्षमपणे वाटचाल करतात याविषयी मार्गदर्शन केले.
       या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहेश्वरी सूर्यवंशी व कुलदीप पवार यांनी केले तर आभार पृथ्वीराज मुंदडा यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निशा शिंदे, वर्षा म्हस्के, अनिता जगताप, अश्विनी गाडे, सुनिता मोटेे, सुमय्या पठाण, मनिषा शिंदे, वंदना खोटे, विजया परळकर, वैशाली घुमरे, ममता पाचखंडे, अलका जंगले आदींनी परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment