तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

संजय बर्वे पोलीस आयुक्त पदी वर्णी सुबोध जयस्वाल नवे पोलीस महासंचालक.

बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : देशात तणावाचे वातावरण असताना महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त पदासारखी महत्त्वाची पदे रिक्त ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे आज(दि.28) तात्काळ ही पदे भरण्यात आली आहेत.संजय बर्वे हे 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यगुप्त वार्ता विभागाचे प्रमुख पद त्यांनी भूषवले होते, .
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या कारकिर्दीला या महिना अखेरीस पूर्ण विराम मिळणार असल्याने, मुंबईचे आयुक्त सुबोध जयस्वाल हे त्या पदाची धुरा सांभाळणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची नावं आघाडीवर होती. अखेर बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी आणि सुबोध जयस्वाल यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सुबोध कुमार जैस्वाल हे 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

No comments:

Post a Comment