तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 March 2019

माजी नगराध्यक्ष अँड.वसंतराव खारकर यांचे निधनसेलू,प्रतिनिधी


येथील जेष्ठविधिज्ञ तथा माजी नगराध्यक्ष अँड.वसंतराव खारकर वय ८६ वर्षे यांचे बुधवार २० मार्च रोजी दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
अँड.वसंतराव खारकर हे  शहरातील जेष्ठ विधीज्ञ होते सोबतचं त्यांची सेलू शहराच्या राजकारणावर  मजबूत पकड होती.शहरात असलेले विविध उद्यान हि खारकर यांचीच देणगी आहे.सेलू शहराचे पहिले नगराध्यक्ष दलीतमित्र श्रीरामजी भांगडीया यांच्या सोबत वसंतराव खारकर यांनी कार्य केलेले असल्याने त्यांच्या नंतर खारकर यांनीच शहराचा विकास केला.
शहरातील के.बा.शिक्षण प्रसारक मंडळ,नूतन शिक्षण संस्था, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय,विविध सोसायटी, अशा अनेक संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून काम पाहत होते.सेलू शहराच्या विकास कार्यात वसंतराव खारकर यांचा मोठा वाटा आहे.सर्व शहर वाशियांचे ते लाडके मामा होते तर खारकर परिवाराचे नाना.संपूर्ण परभणी जिल्ह्यात  मामा या नावानेच प्रसिद्ध होते.
बुधवारी दुपारी त्यांचे  वृद्धापकाळाने  निधन झाले.त्यांच्या पश्चात २ भाऊ,२ मुले,२मुली,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.गुरुवारी दि २१ रोजी सकाळी७-३० वाजता.त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.वसंतराव खारकर यांच्या जाण्याने सेलू शहराच्या शैक्षणिक,राजकीय,सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment