तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 March 2019

ज्युनियर अतिरिक्त शिक्षक नसतांना महिला शिक्षिकेची नियमबाहय बदली


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा जि प कें मुलांच्या शाळेत ९ महिण्या पासुनच कार्यरत असलेल्या व ज्युनियर असतांना तसेच सेवा जेष्ठतेनुसार शिक्षक पटोकार अतिरिक्त ठरत असतांना संबंधीत शिक्षकाचे समायोजनात निवडलेल्या शाळेवर  महिला शिक्षकेचा विचार न करता  नियमबाहय आदेश काढुन  बदली धामणगाव केल्याने महिला शिक्षक शोभा नवलाखे यांच्या वर अन्याय  कारण असुन शासन निर्णय सेवा जेष्ठता शिक्षकांचे समायोजन करावे असा स्पष्ठ उल्लेख असतांना नियम बाहय बदली रद्द करण्याची मांगणी महिला शिक्षीका शोभा ओंकारसा नवलखे यांनी एका निवेदनाव्दारे मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्याकडे केली आहे 
निवेदनात नमुद आहे कि सन २०१८ च्या ऑनलाईन बदल्यामध्ये संबंधीत महिला शिक्षीकाची नियुकती जि प कें प्रा मुलांची शाळा पातुर्डा येथे झाली ४ शिक्षकांच्या बदल्या करुन रिकत जागा भरण्यात आली ३० सप्टेंबर २०१८ च्या संच मान्यतेनुसार १ पद अतिरिकत झाले शासन निर्णय आदेशान्वये सेवाजेष्ठते प्रमाणे सिनियर शिक्षक पटोकार हे अतिरिक्त ठरत असतांना व त्यांना समायोजनाने धामणगाव शाळा देण्यात आलेली परंतु संबंधीत शिक्षक त्या शाळेवर रुजु न होता स्वता अतिरिक्त शिक्षक ठरत असतांना ज्युनिअर महिला शिक्षीकेला अतिरिकत ठरवा अशी मांगणी केली राज्यातील सर्व जिल्हा परिषदामध्ये सेवा जेष्ठते नुसार त्या शाळेवरिल सिनियर अतिरिक्त ठरविल्या गेले तेच नियम जिल्हयातील सर्व तालुक्यात परंतु पातुर्डा मुंलाच्या शाळा येथेच ज्युनियर शिक्षकांचा नियम बाहय आदेश का ? असा प्रश्न उपस्थित करित मुख्यकार्यपालन अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटुन नियम बाह्य बदली रद्द करुन जि प विद्यालय पातुर्डा येथे नियुकती करण्याचे आश्वासन दिले असतांना  धामणगाव शाळेवर संबंधीत शिक्षक पटोकार यांनी माझ्या नावाने धामणगाव  शाळेवरचा काढलेला आदेश  अन्यायकारक असल्याने शासन निर्णय नुसार सेवा जेष्ठता संबंधीत शिक्षकांचे समायोजन करून न्याय दयावा अशी मांगणी निवेदनातुन शिक्षीका शोभा नवलाखे यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांच्या कडे केली आहे

No comments:

Post a Comment