तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 March 2019

राष्ट्रीय भौतिकशास्त्र परिषद संपन्न प्रभावी संशोधन करणे हे राष्ट्रीय प्रगतीसाठी आवश्यक शास्त्रज्ञ प्रोफेसर - डॉ . व्ही . एन . मणि

आतंरशाखीयज्ञान व ज्ञानाधिष्ठित समाजाकडे अग्रेसर होण्या युगात युवकांकडे मल्टीटास्किंग स्किलची आवश्यक

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
येथील भौतिकशास्त्र विभाग वैद्यनाथ कॉलेज व 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद प्रायोजित भौतिकशास्त्र विषयाची एक दिवसीय राष्ट्रीय परिषद दि. २ मार्च  रोजी  नुकतीच संपन्न झाली. फंक्शनल मटेरियल सिंथेसिस अँड कॅरॅक्टरिसेशन टेक्निक या विषयावर  परिषदेत सखोल चिंतन व चर्चा संवाद - संशोधन पेपर सादरीकरण करण्यात आले . त्यात  भारतभरातील शास्त्रज्ञ व १७८ संशोधक,  प्राध्यापक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला . त्यात चौदा राज्यातून , बारा विद्यापीठतील, तर आकरा शासकीय शैक्षाणिक संस्थांनी व चार आय . आय .टी. च्या संशोधन कर त्यांनी सहभाग घेतला . त्यात  भारतातील पंचवीश जिल्हातील प्राध्यापक, संशोधक प्रतिनिधी सक्रिय संवाद सादला. तर ७५ संशोधन लेख पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले .
या कार्यक्रमास प्रमुख आकर्षण शास्त्रज्ञ प्रोफेसर व्ही . एन . मणि हे होते .  कार्यक्रमाचे उदघाटन उदघाटक  कुलगुरू प्रा.बी.ए. चोपडे, यांच्या हस्ते ऑनलाईन  संवाद स्किलचा वापर करून झाले . त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री . जुगलकिशोर लोहिया हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ प्रोफेसर व्ही. एन . मणी,  विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. शंकर आंभोरे , विज्ञान डीन  प्राचार्य मझर अहमद फारुकी,  प्रो. बी. एच. पवार अमरावती, प्रो . डॉ रामपाल शर्मा, डॉ . गजानन मुळे  प्रा.एस.राजमोहमद ,  प्रा गंगाधर शेळके तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहर एजुकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ दे . घ . मुंडे, सचिव दत्ताअप्पा ईटके, सहसचिव डॉ सुरेश चौधरी, कोषाध्यक्ष सुरेश अग्रवाल , प्राचार्य डॉ . आर के इप्पर, डॉ . डी . व्ही . मेश्राम, प्रा . डी . के . आंधळे,  डॉ माधव रोडे अदि  या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत संशोधकांचे पेपर्स चे जर्नल प्रकाशन सी . डी . व ऑनलाइन International  journal  of Advance & Innovative Research उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले . या कार्यक्रमात सर्व उपस्थिती मान्यवरांना भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय संविधान देऊन सन्मानित करण्यात आले . 
 फंक्शनल मटेरियल सिंथेसिस अँड कॅरॅक्टरिसेशन टेक्निक या विषयावरील  परिषदेत तीन सत्रात शास्त्रज्ञ प्रोफेसर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले . त्यात आंतरराष्ट्रीय भारतीय शास्त्रज्ञ प्रोफेसर व्ही. एन . मणि यांनी अवकाशातील व संरक्षण क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणासाठी, उपयुक्त नॅनो ' पदार्थांची भूमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन केले . अल्ट्रॉहायप्युअर सेमिंकंडक्टींग पदार्थाच्या संशोधनातून पुढील नॅनो तंत्रज्ञानाचा आपण विकास करू शकतो . आज एकही कांपोनन्ट आपण भारतीय लोक तयार करीत नाही . 
इतर प्रगत राष्ट्रातून कांपोनन्ट मागवून नुसते असेंब्लिंग करण्याचे काम करीत आहोत . जर आपण अल्ट्राहायप्युअर पदार्थाच्या निर्मितीत मोठे यश मिळविले आणि तंत्रज्ञान विकासित केले तर उत्तुंग प्रगती साध्य होईल . मात्र हे करीत असतांना पर्यावरणाचा समतोल ढळू देता कामा नये . यासाठी अनेक सामान्य वाटणाऱ्या मात्र अतिशय महत्वपूर्ण बाबींवर जोर देणे आवश्यक आहे . मूक्त विचार करणे, अनेकमित विचार करणे, उत्तम संवाद साधणे, सहकार्य करणे - घेणं नवनिर्मिती करणे सृजकता असणे, वैज्ञानिक वृत्ती बाळगणे, ज्ञान व ज्ञानियांचा आदर करणे आणि कोणत्याही मनुष्याला कमी न लेखणे या प्रकारचे देशात वातावरण तयार करणे आणि त्यातून संशोधन प्रभावीकरण हे आपल्या राष्ट्रीय प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे . अशा प्रकारे अत्यंत मोलाचे विचार त्यांनी व्यक्त करुन सगळयांना मंत्र मुग्ध केले . शास्त्रज्ञ  संशोधक,   शिक्षक , डॉक्टर  यांना समाजाव्दारे  सन्मानित केले जाते, मात्र शिक्षकही सन्मानित केला गेला पाहिजे . सर्वांनी राष्ट्रहीत जोपासत कार्य करावे . नॅनो तंत्रज्ञान हे वेगवान प्रभावी स्वस्त स्मार्ट क्रियाशील , उच्च पॅकींग धनता, आप्टोमॅकनिक व प्रदूषण विरहीत अशा वैशिष्टांनी युक्त असणार म्हणून भविष्यात याला महत्व आहे . हे लक्षात घेवून आपण वाटचाल करावी . येणारे युग हे ज्ञानांच युग आहे . या युगात युवकांकडे मल्टीटास्किंग स्किल ची आवश्यकता आहे हे लक्षात द्यावे असे शास्त्रज्ञ प्रोफेसर व्ही . एन . मणि म्हणाले . कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप ज .ए.सो.  अध्यक्ष श्री . जुगलकिशोर लोहिया यांनी केला . या कार्यक्रमास भौतिकशास्त्र विभागप्रमुख  डॉ. दिलीपकुमार  मेश्राम यांच्या मार्गदर्शन खाली संपन्न झाला . कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक प्रा.डॉ . माधव रोडे यांनी केले. कार्यक्रास विशेष सहकार्य  प्रा बी . जी . खाडे,प्रा . मनोज कांबळे, प्रा . ए . एन नागरगोजे, प्रा उत्तम कांदे, प्रा डॉ लक्ष्मण मुंडे यांनी केले .  तर सुत्रसंचलन प्रा एन एस जाधव, प्रा गयानागोराव मस्के मॅडम, तर आभार डॉ. विवेक कवडे,  डॉ. सुनील चव्हाण आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment