तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 March 2019

पाथरी विधानसभा मतदार संघातुन देणार सर्वाधिक लीड;आघाडीच्या बैठकीत एकजुटीचा एल्गारप्रतिनिधी
पाथरी:-महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष व पीपल्स रिपब्लिकन पार्टी (प्रा.जोगेंद्र कवाडे गट) या पक्षांच्या पाथरी शहर व तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक आज पाथरी येथे संपन्न झाली.
लोकसभेची निवडणुक जस जशी जवळ येतेय तस तसे राजकीय वातावरण ढवळूण निघत आहे . जिल्हातील सर्वच पक्षात असणारे गटातटाचे राजकारण व पक्षांतार्गत मत व मनभेद आता मिटवण्याचे काम चालू असून आघाडीचे उमेदवार राजेश विटेकरांनी पाथरी येथिल कार्यकर्ता बैठक घेत घडवून आणलंय सोबतच एकमेकांना पाण्यात पाहणारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व पदाधिकारी एकाच ठिकाणी येत दोघात तिसरा ... अस व्होता कामा नये म्हणुन एक दिलाने काम करत पाथरी मतदार संघातून मताची सर्वाधिक लीड देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.या वेळी खासदार आघाडीचा करायचाच असा निर्धार या वेळी या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करण्यात येऊन विटेकरांना पाथरी विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक आघाडी मिळऊन देण्याचे आवाहन ही या वेळी करण्यात आले.
    मंगळवार दि 19 मार्च रोजी दुपारी तीन वाजता आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या शेतात गुट्टू कारखाण्यावर कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, मा .आ . सुरेश देशमुख , मा . खा . तुकारामजी रेंगे, राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार राजेशदादा विटेकर, जि .प. उपाध्यक्षा भावना नखाते, कृ . उ .बा .स चे सभापती अनिल नखाते, दादासाहेब टेंगसें यांची उपस्थिती होती .
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुनेद दुर्राणी यांनी केले, यावेळी बोलतांना जुनेदखान दुर्रानी म्हणाले की,परभणी लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी पाथरी शहर व तालुक्यातील सर्वजण एकजुटीने, एकदिलाने काम करू आणी मतदारसंघात राष्ट्रवादीला निवडून आणू अशी ग्वाही  बोलताना दिली. या वेळी आ . बाबाजानी दुर्राणी, मा. आ . सुरेश वरपुडकर, मा .आ . सुरेश देशमुख, मा . खा . तुकारामजी रेंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केल . सर्वांनीच यावेळी एकजुटीने काम करणाचा मंत्र एकमेकांसह कार्यकर्त्यांना दिला .

No comments:

Post a Comment