तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 March 2019

मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार मार्च महिन्याचा पगार सातव्या वेतन आयोगानुसार


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी                                                                                   मुंबई : वित्त विभागाचे उपसचिव  राजे घाटगे यांच्यासमवेत माननीय आमदार कपिल पाटील,  शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे , कार्याध्यक्ष सुभाष मोरे,  प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, स्वामी सर तसेच तीनही विभागाचे वेतन अधीक्षक, ऑडिटर यांची पीओ ऑफिस बिकेसी येथे  मिटिंग झाली . सदर मीटिंगमध्ये सातवा वेतन आयोग शिक्षक शिक्षकेतरांना मार्च पेड इन एप्रिल कसा मिळेल याबाबत चर्चा करण्यात आली .मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्टॅम्पिंग एक महिन्यात होणं अशक्य आहे . म्हणून मुंबईतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱयांचा पगार मुख्याध्यापकांनी स्वत: सातव्या वेतन आयोगानुसार फिक्स करून त्याचं वेतनदेयकं १६ मार्च पर्यंत शिक्षण विभागास सादर करावायचे आहे . त्यासंदर्भातील परिपत्रक तीनही शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी(वेतन अधिक्षक) त्वरित काढण्याचं मान्य केलं आहे. पे फिक्स करण्यासंदर्भात काही अडचण येत असेल तर लेखाधिकारी कार्यालय त्यांना  मदत करणार आहे. लेखाधिकारी यथावकाश शिक्षकांचं स्टॅम्पिंग करतील .  लेखाधिका-यांनी शिक्षक शि्क्षकेतरांच्या पे-फिक्सेशनचा कॅम्प या अगोदरच तीनही विभागात घेतलेला आहे . सर्व शाळेतील क्लार्कला या संदर्भात प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेले आहे . तरी सुद्धा क्लार्क किंवा मुख्याध्यापक यांना काही अडचण आली तर लेखाधिकारी कार्यालय त्यांना मदत करेल . फिक्सेशन करण्यासाठी  कोणालाही पैसे देऊ नयेत असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी केले . यासोबत शिक्षकांची मेडिकल बिलांना होणारा विलंब, एरियस बिले वेळेवर न मिळणे , पीएफ लोन संदर्भात देखील चर्चा झाली. तरी सर्व मुख्याध्यापक व क्लार्क यांना विनंती आहे की आपल्या स्तरावर सातव्या वेतन आयोगानुसार पे फिक्स करुन पगार बिले शिक्षण निरिक्षक कार्यालयास वेळेवर  सादर करावीत. जेणेकरून येणारा पगार सातव्या वेतन आयोगानुसार मिळेल.                                                                      
 *जालिंदर देवराम सरोदे*                                                          
 *प्रमुख कार्यवाह*
*शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य*

No comments:

Post a Comment