तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

लोकसभा निवडणूकीतील आनंदाला पुर्णविराम


सुभाष मुळे..
----------------
बीड : लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला होता. त्या दृष्टीकोनातून माजी आमदार अमरसिंह पंडित मतदार संघात संभाव्य उमेदवार म्हणून लोक संबोधत होते. नेमके बैठकीत असताना वृत्तवाहिन्यांवर आलेली बातमी सांगितली.. स्वत: अमरसिंह पंडित यांनाही धक्का बसला असणार.. पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या निर्णयामुळे बीड लोकसभा मतदार संघातल्या विशेषत: समर्थकांना देखील वाईट वाटणे साहजिकच आहे. सांगायचे एवढेच की, राजकीय वरिष्ठ गडर नेत्यांच्या स्वार्थासाठीचे फिक्सिंग सपष्टतेने उमटते. सहज हस्तगत करण्यापेक्षा श्रमातून मिळवलेल्या विजयाचा आनंद द्विगुणित करणारा ठरत असतो. याविषयी जिल्ह्यातील मतदारांना देखिल केलेला फिक्सिंग प्रकार पटणारा नाहीच.
         सध्या गेवराईकरांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहिला आहे. खरं म्हणजे गेल्या आठवडा भरापासून राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांची उमेदवारी गृहीत धरून कार्यकर्ते कामाला लागले होते. दोनच दिवसापूर्वी अमरसिंह पंडित यांना संभाव्य उमेदवार म्हणून गेवराई शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना वाटत होते. दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय जाहीर झाला आणि केज तालुक्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मतदार संघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. अनेकांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित दादा, विद्याताई, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांना फोन करून विचारणा केली व निषेधही केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा एक मेसेज सगळीकडे फिरत होता. सहकारी मित्राने तो मेसेज ऐकवला व प्रतिक्रिया विचारली. जयंत पाटील यांचे मत असे आले की.. बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी विरोध केला म्हणून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर वस्तुस्थिती मांडली गेली आणि म्हणाले की, हे सगळे राजकीय बहाणे वाटतात.. त्यासाठी एक भुतकाळातला संदर्भ समोर आला, शरद पवार (साहेब) नुकतेच राजकारणात आले होते. बारामती मतदार संघात त्यांनी १९६७ साली  ( वय वर्षे २३- २४ ) काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यावेळी बारामतीसह जिल्ह्य़ातील सर्वच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना कडाडून विरोध केला. ११ विरूद्ध १ असा प्रसंग आला. पवार एकटे पडले, पण त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झालेली होती. मा. यशवंतराव चव्हाण , विनायकराव पाटील यांनी मात्र शरदरावांना पाठिंबा दिला पाहिजे म्हणून उमेदवारीचे समर्थन केले. तरीही.. कुणालाही द्या, आम्हाला नको पण शरद पवार यांना देऊ नका, यावर अकरा जण ठाम होते. काय करावे कळेना..शेवटी यशवंतराव चव्हाण सहकाऱ्यांना म्हणाले की, महाराष्ट्रात एकुण असलेल्या 288 मतदारसंघा पैकी आपल्या किती जागा येतील. कुणीतरी त्यांना सांगितले, आपल्या १८० ते १९० अशा जागा येतील. त्यावर चव्हाण साहेब म्हणाले.. तुमच्या सांगण्यावरून ८८ जागी आपला पराभव होईल, मग अस करा..अजून एक जागा गेली अस समजा, चला शरदच्या नावावर शिक्कामोर्तब करूया..... हा संदर्भ एवढ्याच साठी दिला आहे. द्यायचे झाले तर विरोध बिरोध सगळे झुट असते. आल का ध्यानात...? राजकारणात अशा सगळ्या गोष्टी चालत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम ठेवायला हवा, कारण पक्षपातळीवर झालेला निर्णय हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा असतो. कुणाच्या सांगण्यावरून ते निर्णय घेत नाहीत. समाजाच्या विविध गटात सर्व्हे केले जातात. त्यांची माणसे छुप्या पद्धतीने मतदार संघात फिरत असतात. त्यानंतर कार्यकर्ते आणि महत्त्वाचे म्हणजे मतदार संघातल्या नेत्यांना विचारून असा निर्णय जाहीर केला जातो. एवढे सगळे होऊनही बिघडले कुठे असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात येणे साहजिक आहे. 
       खरं तर अमरसिंह पंडित यांना अपेक्षा, इच्छा आणि मागणी नसताना देखील संभाव्य उमेदवार म्हणून कामाला सुरुवात करावी लागणार होती. मतदार संघातल्या अनेक गावांमध्ये त्यांच्या विविधांगी बैठकांवर बैठका सुरू होत्या. कार्यक्रमांचे नियोजन लावले जात होते. अतिशय जवळची माणसं मतदार संघात फिरत होती. असे असताना बजरंग सोनवणे यांचे नाव अचानक कसे काय आले, यावर आता खल सुरू आहे.  जिल्ह्यातल्या मातब्बर नेत्यांनी अमरसिंह पंडित यांना विरोध केला असं प्रमुख कारण पुढे येत आहे.. काल काही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ते प्रकर्षाने जाणवते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुमच्या मतदार संघातून विरोध झाल्यामुळे अमरसिंह पंडित यांचे नाव मागे पडले आणि मग शेवटी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे यामध्ये आमचा काही रोल नाही असे सांगून वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी हात झटकले आहेत. विशेष म्हणजे अजितदादा, विद्याताई, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांना कार्यकर्त्यांनी फोनवरून आपल्या भावना कळवलेल्या आहेत. त्यावर अजित दादांनी हा निर्णय मला आवडलेला नाही.. असे प्रत्यक्ष सांगून राष्ट्रवादीमध्ये गट तट असल्याचे संकेत दिले. गट तट निर्माण झाले की मग पक्षात दोन हात करावे लागतात. अशा वेळी परिस्थिती काय होईल समजून येत नाही. अमरसिंह पंडित थोडे आक्रमक वागतात. मागच्या काळामध्ये दोन वेळा ते आमदार झाले. जिल्हा बँकेवर ते अध्यक्ष होते. या पदांमधून जिल्ह्यामध्ये स्वतःचे नेतृत्व करण्यामध्ये गट पडले आणि त्यांना पक्षात विरोध वाढत गेला असावा असे एकंदरीत दिसते. त्यांची उमेदवारी फायनल असताना भूतकाळातल्या काही घटना समोर आल्याने त्यांचा पत्ता कटला असावा अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यात कोण कोण आहे, हा संशोधनाचा विषय आहे. गेवराई तालुक्यात अमरसिंह पंडित यांच्यानंतर विजयराजे यांना महत्त्वाचे स्थान आहे. दोघांमध्ये फरक करायचा झाला तर अमरसिंह पंडित हे आक्रमक आहेत तर विजयसिंह पंडित हे परिस्थितीनुरूप जुळवून घेतात आणि त्यांचा स्वभाव थोडा मवाळ असल्याचे काही राजकीय जाणकारांना वाटते. त्यामुळे हा फरक सुद्धा या ठिकाणी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 
      अमरसिंह पंडित यांची कार्यपद्धती पाहता उद्या ते खासदार झाले तर आपल्याला डोईजड होतील. नाकापेक्षा मोती जड, या अर्थाने त्यांना राष्ट्रवादीच्या काही लोकांनी विरोध केलेला दिसतो. खरं खोटे आज ना उद्या कळेलच. त्याचबरोबर एवढा विरोध असूनही पक्षनेतृत्वाने ठरवले असते तर अमरसिंह पंडित यांच्या पारड्यात ही उमेदवारी नक्की गेली असती. पक्षपातळीवर सुद्धा एक अजित पवार सोडले तर त्यांच्या बाजूने कुणी उभे राहिले असेल असं दिसत नाही. खरं म्हणजे कोर कमिटीचा निर्णय सर्वांना स्वीकारावा लागतो. पक्षाची उमेदवारी कोणाला द्यायची हायकमांड ठरवतात. नेते विरोध करत असतात. निर्णय झाल्यानंतर निवडणुकीच्या धामधुमीत आपल्या मनाविरुद्धच्या निर्णयावर गप्प बसावे लागते. अशा बिकट परिस्थितीमध्ये आयाराम-गयाराम सारखा निर्णय घेता येत नाही. त्यामुळे पक्षाने अमरसिंह पंडित यांनाच उमेदवारी द्यायला पाहिजे होती. परंतु आता निर्णय झालेला आहे. निर्णय का झाला, कसा झाला, कुणी घेतला ..? हा भाग वेगळा आहे. त्यावर आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी आक्रमक धोरण स्वीकारल्याचे लक्षात येते. वाऱ्यांमुळे विझत असलेल्या ज्या दिव्यांची काळजी घेतली.  त्या दिव्यांनी चटके दिले, अशी अगतिकता आणि हतबलता व्यक्त करणारी फेसबुक पोस्ट अनेक गोष्टी सांगणारी आहे. ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. शेवटी असं आहे की , लढायला सांगायचे आणि नंतर तिकीट न देता अपमान करायचा असा, हे काही बरोबर नाही. आता विजयसिंह पंडित हे काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे. वरिष्ठ पातळीवरून आणि जिल्ह्यातील त्यांचे काही सहकारी त्यांचे मन वळवतील आणि तेही जोमाने कामाला लागतील असे एकंदरीत चित्र दिसते. गेवराई मतदार संघात आणि जिल्ह्यात घड्याळाचा गजर करतील असे वाटते. पंडीत हे लोकसभेचे उमेदवार असते तर गेवराई तालुक्यातून त्यांना बऱ्यापैकी मतदान झाले असते. त्या पद्धतीच्या आणि त्या संदर्भातल्या चर्चा मतदार संघात व्यक्त होत होत्या. एक तर गेवराई शहराला प्रतिनिधित्व मिळत होतं. अनेक वर्षापासून गेवराई मतदार संघ जालना लोकसभा मतदार संघालाा जोडला होता. गेवराई हा बीड जिल्ह्यात येतो. मात्र लोकसभेत जालना मतदार संघात मतदान करायचा. त्यानंतर दोन-तीन टर्म पासून गेवराई मतदार संघाचे बीड लोकसभा आहे. ही अतिशय चांगली संधी अमरसिंह पंडित यांच्या रूपाने यांना मिळाली होती. आता पुढे काय होईल हे सांगणे आज तरी अवघड आहे. कारण स्वतः उमेदवार असणे आणि इतरांचा प्रचार करणे यामध्ये खूप अंतर असते. एक मात्र नक्की की, गेवराई मतदार संघाला मिळालेली संधी थोडक्यात हुकली. झारीतले शुक्राचार्य शोधायची गरज आहे. प्रचार करूनही ते करता येईल. तो आता अमरसिंंहांंचा प्रश्न आहेे, परंतु कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या आणि आहेत. लोकांना देेेखिल अनन्य कारणाने हुरहुर आहे.....

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment