तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत रविवारी माजलगाव, वडवणी, धारूर, केज येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठका


बीड  (पंतिनिधी) :- दि.16.......... बीड लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत उद्या रविवार दि.17 मार्च रोजी माजलगाव, वडवणी, धारूर व केज येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठका होणार आहेत.

शुक्रवारी बीड लोकसभेसाठी बजरंग बप्पा सोनवणे यांना उमेदवारी जाहीर होताच आघाडीच्या प्रचारास शनिवार पासून कार्यकर्त्यांच्या बैठकांनी सुरूवात झाली. शनिवारी पाटोदा, आष्टी, शिरूर येथे बैठका झाल्यानंतर उद्या रविवार दि.17 मार्च रोजी माजलगाव येथे सकाळी 10 वाजता, दुपारी 01 वाजता वडवणी, दुपारी 04 वाजता धारूर व सायं 07 वाजता केज येथे बैठका होणार आहेत. 

या बैठकीस माजी मंत्री प्रकाशदादा सोळुंके, माजी आ. अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे, उषाताई दराडे, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, युवक नेते अक्षय मुंदडा, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, सतिष शिंदे, चंपावतीताई पानसंबळ, महेंद्र गर्जे, जयसिंग सोळुंके, डॉ.शिवाजी राऊत तर काँग्रेसच्या वतीने माजी खा.रजनीताई पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी, माजी आ.सुरेश नवले, माजी आमदार सिराज देशमुख, ज्येष्ठ नेते प्रा.टी.पी.मुंडे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

  लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या तालुकानिहाय बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. बीड लोकसभा मतदार संघातून आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी करावयाच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment