तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 March 2019

लोकप्रतिनिधींच्या विरोधात परळीकरांचा रास्ता रोको परळी-अंबाजोगाई रस्त्यासाठी पुरुष,महिला उतरल्या रस्त्यावरमहादेव गित्ते
----------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम दुसर्‍यांदा बंद पडुन पंधरा दिवस उलटुन गेले तरी हे काम सुरु होत नसल्याने व रस्ता उकरुन ठेवल्यामुळे उठणार्‍या धुळीच्या लोटाचा त्रास सहन करणार्‍या परळीकरांनी आज अंबाजोगाई रस्त्यावर रस्ता रोको केला. जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांच्याबरोबरच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडुन या रस्त्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचा संताप यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. सकाळी 9 वाजता सुरु झालेले हे आंदोलन दुपारी 1 वाजे पर्यंत सरुच होते. या आंदोलनात परळीच्या पश्‍चिम भागातील नागरिक आपल्या परिवारासह सहभागी झाले होते. 
मागील दीड वर्षापुर्वी पिंपळा ते परळी 18.44 किलोमिटर या मार्गाचे काम सुरु करण्यात आले होते. टप्पया टप्याने काम करण्याऐवजी गुत्तेदाराने हा 18.44 किमीचा संपुर्ण रस्ता उखडून टाकला तीन महिन्यापुर्वी सदरील गुत्तेदाराने हे काम बंद केल्याने नागरिकांतुन संताप व्यक्त होता. यानंतर दि.22 नोव्हेंबर 2018 यांनी हे काम दुसर्‍यांदा सुरु करावायास लावुन यापुढे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही. या बाबात कंत्राटदारांना तंबी दिली होती. परंतु अवघ्या दोन महिन्यात हे काम बंद पडले. यामुळे नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संतापलेल्या नागरिकांनी आज दि.10 मार्च 2019 रोजी परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील शंकर पार्वती नगर समोर रस्ता रोको करण्यात आला. या रस्ता रोको मध्ये महिला लहान मुलांसह नागरिकांनी सहभाग नोंदविला. सकाळी 9 वाजता सुरु झालेले हे आंदोलन दुपारी 1 वाजे पर्यंत सुरुच होते. यावेळी परळीच्या दोन्ही लोकप्रतिनिधीं विरुध्द नागरिकांतुन संताप व्यक्त करण्यात आला. शासनाच्या घोषणाबाजी करत रस्ता नाहीतर नाही किमान धुळीपासुन आमची सुटका करावी अशी मागणी लावून धरली. या रस्ता रोकोमुळे परळी अंबाजोगाई रस्त्यावरील वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या दुरदुरवर रांगा लागल्या होत्या. रस्ता उखडल्यामुळे या वाहनामधुन परळीकडे येणार्‍या प्रवाशांना कसरत करावी लागत होती. परळी-अंबाजोगाई रस्तयाचा हा प्रश्‍न चिघळला असुन पालकमंत्री ना.पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राज्याचे राजकारण करीत असतांना आपल्याच गावच्या रस्तयाकडे दुर्लक्ष करत असल्याने परळीकरांनी स्वयंपुर्तीने सहभाग नोंदवत हा रस्ता रोको केला.

No comments:

Post a Comment