तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

जी.डी.इंग्लिश स्कूल पाथरी चे तिसरे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा

 प्रतिनिधी
पाथरी:-,शहरातील नामवंत जि डी इंग्लिश स्कूल चा "गौरव स्त्री शक्तीचा" स्नेहसंमेलन कार्यक्रम शुक्रवार २९ मार्च २०१८ रोजी पार पडला.

या वेळी कायर्क्रमाच्या अध्यक्ष स्थानी  प्रवीण देशमुख संस्थपक अध्यक्ष लोणार शिक्षण प्रसारक मंडळ हे होते तर प्रमुख उपस्थितीत रोहिदास टेंगसे केंद्र प्रमुख प्रमुख उपस्थिती शेतिनिष्ठ शेतकरी  पुरस्काराने सान्मानित सदाशिव थोरात ,क्रीडा प्रेमी छत्रपती पुरस्कार सन्मानित भारत धरले,जेष्ठ पत्रकार तथा जन्मभूमी फाउंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील यांच्या सर्वांच्या उपस्थित दीप ज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल पुष्प गुच्छ स्मतिचिन्ह देऊन गौरव करत शाळेचे संचालक राम घटे व शेख सलिम यांनी स्वागत केले.

कार्यक्रमाचे मुख्य उद्देश गौरव स्त्री शक्तीचा हे होते विविध क्षेत्रातील पाच कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार सोहळा येथे घेण्यात आला .
या मध्ये सौ भावनताई नखाते,सौ मीनाताई भोरे,सौ जयश्रीताई घटे,डॉ रोहिणी देशमुख, मनीषा जाधव संगीता मंत्री,वृन्दावणी गोरे यांना पुष्प गुच्छ व सम्मान चीन्ह देऊन गौरविण्यात आले

त्या नंतर जी डी इंग्लिश स्कूल च्या  लहान चिमुकल्यांचे   रेकॉर्डडान्स घेण्यात आले या सर्व मुलांना देशावरील प्रेम, महिला डॉ नसल्याने होणारे परिणाम विविध प्रकारचे संदेश आपल्या नृत्या च्या आधारे आलेल्या सर्व पालकांचे मन जिंकून कौतुकाची थाप घेतली. दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी कार्यक्रमास उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला या कार्यकचे सूत्र संचालन वायकोज यांनी केले तर आभार शाळेचे संचालक शेख सलिम यांनी केले.

No comments:

Post a Comment