तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

मराठा उद्योजक लॉबीची सर्वसाधारण सभा रविवार दि.३ मार्च २०१९ रोजी घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर मधील प्रति श्री ज्योतिबा मंदिर सभामंडप पार पडली.


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
 मुंबई : दि. कार्यक्रमासाठी सांगली,कोल्हापूर,पुणे,तसेच फेसबुक व पुढारी पेपर मधील  बातमी वाचून जालना व इचलकरंजी येथील मुंबईत कामानिमित्त आल्याची संधी साधून मुंबईत ठाणे,विरार नवी मुंबई पनवेल सह 350 पेक्षा जास्त सभासदांनी व्यवसायिक मार्गदर्शन ऐकन्यासाठी उपस्थिती दर्शवली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेची आलेले पाहुण्याच्या हस्ते हार व पूजा करत व प्रति ज्योतिबा मंदिर समितीतर्फे दीप प्रज्वलन केले.
 त्यानंतर श्री संदीप पाटील सांगली यांनी मराठा उद्योजक लॉबीचे उद्दिष्ट व संकल्पना सभासदपर्यंत पोहचवून सुत्रसंचलनाची जबाबदारी संभाळत व्यवसायिकांचे मनोबल वाढवत  सभासदांमध्ये  उत्साह निर्माण करण्याचे मोलाचे काम  केले.
 कार्यक्रमात मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने संदीप पाटील पुणे,अरविंद फाजगे पाटील,प्रवीण महाडिक,राजेश शिंदे कोल्हापूर,श्रावण दिवटे, छाया इंदुलकर,सचिन पाटील,शिवाजी बेलोटे,गौरव सोनवणे,शिवानी रेवदंडकर,निलांबरी शिंदे यांनी  लॉबी विषयी आपल्या भावना व्यक्त करत व्यवसाय वर मार्गदर्शन केल.
या कार्यक्रमाला खास पुढारीचे संपादक श्री चंद्रकात माथाडी,तर मिटकाँन 5 महानगर पालिकेच्या मार्गदर्शक श्री प्रकाश मोहिते यांनी मिटकाँन तर्फे फ्री कोर्सेस व लोन विषयी मागरदर्शन करत नवं व्यवसायिकांच्या व्यवसायाच्या भावना उंचवण्याच्या दृष्टीने चांगले मार्गदर्शन केले,तर abp माझाचे रिपोर्टर श्री प्रशांत बढे यांनी मराठा उद्योजक लॉबी करत असलेल्या कामाबद्दल आनंद व्यक्त केले,तर असल्फा चे नगर सेवक किरण लांडगे यांनी आपल्या व्यवसाय याची सुरुवात व अडचणीवर कशी मात करावी यातूनच स्वतःच्या व्यवसायात केलेली प्रगती कशी  साधली यातून व्यवसायिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आपल्या शैलीतून व्यक्त केला,व श्री चंद्रकात माथाडी,श्री प्रकाश मोहिते,श्री किरण लांडगे पुढील वाटचालीस शुभेच्छा देत कुठल्याही अडचणीत आपल्या टीमला सहाय्यता करण्यात येईल असे आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मराठा उद्योजक लॉबीचे अध्यक्ष व संस्थापक विनोद बढे यांनी आपल्या भावना व तळमळ व्यक्त करताना व्यसायिक अडचणी मार्केट मधील वाटचाल व राजकीय स्वार्थ सोडून मुंबईत एकजुटीने काम करण्याची खरी गरज आहे कारण माझा तळागाळातील नवऊद्योजक आर्थिक सक्षम होणार नाही व त्यापुढेही एक उंचीवर प्रत्येकाला नेण्यासाठी मराठा उद्योजक लॉबी ची टीम अहोरात्र काम करत राहिल त्यासाठी मार्केट मध्ये प्रत्येकाचे वर्चस्व निर्माण करन्यासाठी नाशिक मध्ये एप्रिलमध्ये 5,6,7 नाशिक महोत्सव  आयोजन केले असून लवकरच मुंबईत मोठा महा एक्सपोचे आयोजक मराठा उद्योजक लॉबी(MUL) करून सर्वसामान्य सभासदाला मार्केटमध्ये  आपली जागा व ब्रँडचे नाव मिळवून देण्यात येईल यासाठी एक्स्पो आयोजित केले जातील.
कार्यक्रमास खास तळागाळातील सभासद निर्माण व्हावे यासाठी घाटकोपर पुर्व कामराज नगर मध्ये सभा घेतल्याबद्दल मुंबई टीमचे आभार मानले.व ही खऱ्या अर्थाने मुंबईत सुरुवात झाली असे मी म्हणेन.
 कार्यक्रमासाठी ज्या लोकांनी आपले स्टॉल व जाहिरात देऊन साहाय्य केले व कार्यक्रमासाठी बिनामोबदलासह अनेक सहाय्य केल्याबद्दल प्रति श्री ज्योतिबा प्रतिष्ठाण चे आभार मानले.
पुण्यातून विजय गुंजाळ,अनिल सुरवसे,बापू बारले मुंबई टिम मधून उदय थोरात, वैभव फडतरे,कृषीराज चव्हाण,देवराम हाडवळे, सचिन पाटील,डिझाईनर कल्पेश शेलार,अविनाश शिंदे,गुरुदत्त पवार, सैद पाटील,मंगेश शेळके,राकेश मोरे,दर्शन वातकर,अमोल धुमाळ, प्रशांत निमसे,उमेश पाटील,सचिन भोर(फोटोग्राफी)यांनी  मोलाचे सहकार्य केले

No comments:

Post a Comment