तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा येथील १३ वर्षीय चिमुकल्याने जोपासला अनोखा छंद.
अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा या छोटयाशा गावातील १३ वर्षीय सिकलसेल आजाराने ग्रस्त चिमुकल्याने  अनोखा छंद जोपासलाय. विद्यार्थी दशेत शिकत असताना बालमनावर अलगद असे बरेच परिणाम होत असतात. अत्यंत गंभीर अश्या या आजाराने ग्रासलेल असतानाही चिमुकल्या हर्षदने आपल्या कलागुणांना जपले आहे.
सिकल पेशीचा आजार हा आजार सिकल पेशी रक्तक्षय किंवा ड्रेपॅनोसायटोसिस या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. तांबड्या रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. तांबड्या रक्तपेशीतील हीमोग्लोबिन जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशीचा आकार बदलतो. असे रुग्ण अल्पायुषी असतात, असे असतानाही हर्षलने आपला छंद जोपासला आहे. तो त्याच्या कलेने हुबेहूब निसर्गनिर्मित फुले बनवतो. या सोबतच शालेय साहित्याला लागणाऱ्या वस्तू जसे की कंपॉस, पुस्तकाला लागणाऱ्या कव्हर, इत्यादी वस्तू तो बाजारात मिळणाऱ्या क्राफ्ट पेपर पासून तयार करतो. 

आज चिमुकला हर्षद हा विवरा येथील श्रीमती रुख्मिणीबाई बोचरे विद्यालयात इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. आपले शिक्षण आणि अभ्यास सांभाळून त्याने हा छंद जोपासला आहे. त्याला सिकलसेल आजार असल्याने आई वडिलांना सोडून तो बाहेरगावी शिकायला जाऊ शकत नाही. अभ्यास संपून त्याला मिळेल त्या वेळेत तो आपले साहित्य घेऊन बसतो आणि हुबेहूब बाजारात मिळतील अशी फुले, पुस्तकांचे कव्हर, पत्रव्यवहारासाठी लागणारे विविध अँनव्हलप, पोस्टाची पत्रे बनवतो.

No comments:

Post a Comment