तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी शिवसैनिक सरसावलेगल्लोगल्ली फिरून मतदारांशी साधला संवाद 

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- दि. 30.....
     बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी आज शहराच्या विविध भागात प्रचार फेरी काढुन मतदारांशी संवाद साधला. शहराच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. 
        भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती सेनेची युती झाल्यापासून सर्वच पक्षांचे पदाधिकारी एकदिलाने कामाला लागले आहेत. परळीच्या शिवसैनिकांनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी प्रचारात जोरदार सहभाग घेतला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागले असून गल्लोगल्ली जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी आज गंगासागर नगर, कृष्णा नगर  , सिद्धेश्वर नगर, खुदबे नगर या भागात प्रचार फेरी काढुन मतदारांच्या भेटी घेतल्या.
       शिवसैनिकांनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. सुभाष चौक, नुरानी मजीत एरिया, काकर मोहल्ला, आझाद नगर, सिध्दार्थ नगर, भीमवाडी आदी भागातून भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या रॅलीत शिवसेनेचे नेते तथा वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायण सातपुते, माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोईटे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख महेश केंद्रे, प्रकाश साळुंके आदी सहभागी झाले होते.              ‌

No comments:

Post a comment