तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

एस.आर.देशमुख यांच्या आई पाठोपाठ वडीलांचेही दु:खद निधनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
येथील उर्जानगर वसाहतीतील न्यु हायस्कुल शाळेचे पर्यवेक्षक व आदर्श शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष एस.आर.देशमुख यांचे वडील राजाराम देशमुख (वय १०३) यांचे रविवारी वृध्दापकाळाने निधन झाले. गेला आठवड्यातच त्यांच्या मातोश्री कमलबाई राजाराम देशमुख (वय९५) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले होते. राजाराम देशमुख यांच्यावर ढोकी, जि.उस्मानाबाद येथे रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या आठवड्यात एस.आर.देशमुख यांच्या मातोश्री कमलबाई देशमुख यांचे निधन झाले होते, त्यांच्या पश्चात लागोलाग आठवडाभराच्या फरकाने वडील राजाराम देशमुख यांचे निधन झाल्याने देशमुख परिवारावर दुहेरी दु:ख कोसळले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलं, पाच मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. न्यु हायस्कुलचे पर्यवेक्षक एस.आर.देशमुख यांचे ते माता-पिता होते.

No comments:

Post a Comment