तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 March 2019

शंकरराव गित्ते यांचे निधन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
नंदागौळचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंकरराव कोंडिबा गित्ते यांचे आज दि.10 रोजी सकाळी लातुर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज दुपारी 3 वाजता नंदागौळ येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
नंदागौळचे माजी सरपंच असलेले शंकरराव गित्ते हे परळी व परिसरात जुने राजकारणी म्हणुन प्रसिध्द होते. या बरोबरच शेतीनिष्ठ शेतकरी म्हणुन ते परिचित होते. परळी कृ.उ.बा.स.च्या संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. लातुर येथील खाजगी दवाखान्या त्यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर आज दुपारी 3 वाजता नंदागौळ येथील स्मशानभुमीत अंत्यसंसकार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा  परिवार आहे.

No comments:

Post a Comment