तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

संग्रामपूर तालुका कॉग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन राष्टवादी पक्षाचा जाहीर पाठींबा


संग्रामपुर [ प्रतिनिधी]
भारतीय राष्टीय कॉग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राहुल बोन्द्रे यांच्या अटकेच्या निषेधार्थ मंगळवार रोजी संग्रामपूर येथील तहसील कार्यालया समोर तालुका कॉग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करून भाजप सरकार शासनाचा  जाहीर निषेध नोंदवला आहे,
 शासन विरुद्ध नारे बाजी करून आमदार बोन्द्रे यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा व त्यांच्या  अटकेचा निषेध करण्यात येत भाजप सरकार हे जनतेवर हुकमशाही करीत असून सत्तेचा दुरुउपयोग करून जनते वर खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना खोटया गुन्ह्यात गोवण्यात आले स्वताचा राजकणातील रस्ता मोकडा करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहेत  शासन विरुद्ध नारे बाजी करून आमदार बोन्द्रे यांच्या सह कार्यकर्त्यवर दाखल करण्यात आलेला गुन्हा व त्यांच्या अटकेचा जाहीर निषेध करण्यात करण्यात येऊन संग्रामपूर तालुका कॉग्रेस ला पाठींबा देत तालुका राष्टवादी च्या धरणे आंदोलनातं सहभागी होत धरणे आंदोलन दिले तसेच या बाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र वानखडे,कॉग्रेस जेष्ठ नेते रामदास पांडव,प्रेसेजीत पाटील, संजय ढगे, संतोष राजनकार,श्रीकृष्ण दातार , जुबेर पटेल ,मीनाक्षी हागे,राष्ट्रवादी ता अ नारायण ढगे,राजेन्द्र बकाल , शेख महेमुद , सिद्दीक कुरेशी ,राजू राठोड,अमोल घोडेस्वार, कमरोद्दीन मिर्झा ,संतोष टाकळकार,सतीष टाकळकार,बळीराम धुळे,मनोहर राऊत,अमोल पाटील,रामराव बावने,अखिलेश खंडारे,दिलीप वानखडे,शे,महोमद,दुर्गासींग सोळंके,सुरेश इंगळे, यांच्या सह मोठ्या संख्येने कॉग्रेस व राष्टवादी पक्ष्याचे पदाधिकारी सह कार्यकर्ते सहभागी झाले होते

No comments:

Post a Comment