तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून अनमोल शाळेत 'बहरली' आनंद नगरीसुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. १६ ( प्रतिनिधी ) प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने गेवराई येथील अनमोल प्राथमिक विद्यालयात आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग दर्शवून आनंद घेतला. 
        याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई येथील अनमोल प्राथमिक विद्यालयात जागतिक ग्राहक दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुदर्शनजी राऊत, राजेश जाधव, ह.भ.प. परमेश्वर वाघमोडे, बागपिंपळगावचे सरपंच तात्याराम सूळ, महिला पालक प्रतिनिधी म्हणून प्रियंका पंडित, सखारामजी सौंदलकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ग्राहक दिन यानिमित्ताने मुलांचे मनोरंजन व्हावे तसेच त्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने सदरील आनंद नगरीचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. दरम्यान शाळेच्या संस्थापिका अध्यक्षा वैशाली देशमुख यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेच्या कार्यवाहीका शिल्पा घोटनकर यांंनी याप्रसंगी वार्षिक अहवाल सादर केला. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी या शाळेविषयी व विद्यार्थ्यांविषयी प्रत्यक्षदर्शीनी अभिप्राय देत विविध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरविण्यात आले.
        विद्यार्थी व पालक यांनी एकत्रित येऊन खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची खरेदी विक्री करत या आनंद नगरी दरम्यान मुख्याध्यापक रुपनर सर, आनेराव मॅडम, भोसले मॅडम, खांडके सर, परदेशी मॅडम, व्ही. व्ही. मिसाळ, पी. पी. पाठक, सारिका देशपांडे तसेच सविता मॅडम, कुलकर्णी मॅडम आदींनी सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment