तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

मनसे आमदार शरद सोनवणे अखेर शिवसेनेत दाखल


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : दि.११ शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब व खासदार मा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या भगव्या पर्वाची लाट..!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभुमिचे सुपुत्र, किल्ले शिवनेरीचे शिलेदार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रातील एकमेव आमदार मा.शरददादा सोनवणे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब, शिवसेना खासदार मा.शिवाजीराव दादा आढळराव पाटील, शिवसेना सचिव मा.मिलींदजी नार्वेकर, शिवसेना प्रवक्या व आमदार मा.निलमताई गोऱ्हे, मा.मंत्री मा.दिपकजी सावंत, आमदार मा.सुरेशभाऊ गोरे,जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे संपर्कप्रमुख मा.बबनराव थोरात,
जुन्नर विधानसभा संपर्क प्रमुख दिलीपदादा बाम्हणे, महिला संघटक दिपमालाताई बढे,
पुणे जिल्हा समन्वयक संभाजीशेठ तांबे,जुन्नर तालुकाप्रमुख माऊलीशेठ खंडागळे,जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, जिल्हा परिषद सदस्य देवरामशेठ लांडे,ओझर गणपत्ती देवस्थानचे विश्वस्त व मा.युवासेना जिल्हाधिकारी गणेशभाऊ कवडे, घाटकोपर भटवाडी मा.नगरसेवक दिपकबाबा  हांडे, विद्यमान शिवसेना नगरसेविका सौ.अश्विनीताई हांडे
यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन, मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला.
आमदार शरददादा सोनवणे यांच्या समवेत खेड तलुक्यातील जेष्ठ नेते मा.अशोकराव खांडेभराड, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.रामदास आबा धनवटे, ह.भ.प.मा.पंकज महाराज गावडे, जेष्ठ नेते मा.सुनिलजी मेहेर, मा.नेताजीदादा डोके, यांच्यासह विविध पक्षांतील नेते, विविध गावचे सरपंच व हजारो कार्यकर्त्यांनी जल्लोषात शिवसेनेत प्रवेश केला.

No comments:

Post a Comment