तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

शैक्षणिक प्रगतीबरोबर सांस्कृतिक प्रगती महत्त्वाची होय डॉ संजय कदमअरुणा शर्मा


पालम :- शैक्षणिक प्रगतीबरोबर सांस्कृतिक प्रगती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आधार हॉस्पिटल चे संचालक डॉ. संजय कदम यांनी दि. 1 रोजी ज्ञानदीप नॅशनल इंग्लिश स्कूल आयोजीत करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमा प्रसंगी बोलताना म्हणाले.
यावेळी प्रा.आनंदराव शिंदे, डॉ. शिवाजी कदम, जगदंब परीवारचे डॉ. निलेश दळवे, मा. सरपंच भास्करराव सिरस्कर, मा. सभापती वसंतराव सिरस्कर, जि.प.मा. सभापती चित्राताई दुधाटे, रेखाताई कदम, नगरसेविका मालताताई रोकडे, सुनील सिरस्कर, रामजी मनियार, विजय घोरपडे, पत्रकार मारोती नाईकवाडे, व्यासपीठावर उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
  पुढे बोलताना कदम म्हणाले की  ज्ञानदीप नॅशनल या शाळेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत कमी शुल्लक मध्ये दर्जेदार ज्ञानाची दारे खुले करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी रंगमंचावर एकाहून एक  अप आपले कलागुण सादर करत उपस्थित प्रेक्षकांची खेळून ठेवले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले. तर आभार पठाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक गणेश शिंदे, गणेश कदम, पठारे सर, प्रमोद दुधाटे, राजु कराळे, अजय सिरस्कर आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment