तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 March 2019

"नेता नही बेटा है हमाराची" भावनिकसाद;परिवर्तना साठी युवकांचे माझी निवडणुक मीच खासदार अभियान;श्री साईबाबा चरणी नतमस्तक होत विटेकरांचा प्रचार सुरू

प्रतिनिधी
पाथरी:-लोकसभा  निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून राकाँने परभणी लोकसभे साठी गुरूवारी राजेश दादा विटेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असली तरी या पुर्वी पासूनच जि प चे माजी अध्यक्ष असलेले आणि स्वच्छ प्रतिमा असना-या  विटेकरांचा प्रचार या सोशल मिडीयातून जोरदार सुरू असून,"नेता नही, बेटा है हमारा" ची भावनिक साद घालत "माझी निवडणुक मीच खासदार" हे पोस्टर अभियान युवा वर्गातून जोरदार पणे राबवले जात आहे. आता हे अभियान गावकुसातील वाडी,वस्त्या,तांडे शेतात राबत असून हातात राजेश विटेकरांचे पोस्टर घेऊन ते सोशल मिडीयात व्हायरल केले जात आहेत.त्या मुळे निवडणूक अर्ज भरण्या पुर्वीच राजेश विटेकरांचा प्रचार जोरदार सुरू असून तरूणाई विकासाचा मुद्दा पुढे करत विविध पोस्ट शेअर करतांना दिसत आहेत. तर विटेकरांनी श्री साईबाबा जन्मस्थान मंदिरात साई चरणी नतमस्तक होत प्रचाराला सुरूवात केली आहे.विटेकरांच्या या प्रचारातील आघाडीचीच चर्चा सर्वत्र होतांना दिसुन येत आहे.

यावेळी परिवर्तन करायचेच या उद्देशाने तरूण मंडळी सोशल मिडीयात गेली अनेक वर्षाचा इतिहास मुद्देसुद मांडत या वरिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.या आवाहनाला दिवसें दिवस प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असून गावकुसातील सामान्य शेतकरी, मजुर,उसतोड कामगार ही आता या अभियानात सक्रिय होत "नेता नही, बेटा है हमारा"  असे भावनीक आवाहन करत या चळवळीत विटेकरांचे पोष्टर हातात घेत फोटो काढून ते सोशल मिडीयात टाकले जात आहेत. राजेश विटेकर हे युवा असल्याने युवकां मध्ये त्यांच्या विषयी प्रचंड आकर्षण दिसून येत असून. वयस्क मंडळी ही याला चांगला प्रतिसाद देत आहे. विटेकरांना निवडणुकी साठी पैसा कमी पडू नये म्हणून अनेक ठिकाणी गावागावात युवक पुढाकार घेत जमेल तसा चंदा जमा करून निवडणुकी साठी देण्याची धडपड होत आहे. विटेकरांचे चित्र असलेले बॉक्स बनऊन त्यात निधी गोळा केला जात आहे.या अभियानाला ही जनता भावनिक होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचे फोटो सोशल मिडीयात सर्वत्र व्हायरल होतांना दिसत आहेत.एकूनच इतर उमेदवारांच्या तुलनेत सद्यस्थितीत विटेकरांनी अर्ज भरण्या पुर्वीच प्रचारात जोरदार हवा भरली असून याची प्रचिती आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी परभणीकरांना अनुभवायला मिळेल कारण या वेळी खा छत्रपती उदयनराजे भोसले आणि राकाँ प्रदेशाध्यक्ष आ जयंत पाटील हे परभणीत विटेकरांचा उमेदवारी अर्ज भरण्या साठी येणार असल्याने परभणीत प्रचंड प्रमाणात गर्दी होणार असे चित्र आत्ताच दिसून येत आहेत.विटेकरां साठी राकाँचे जिल्हाअध्यक्ष असलेले आ बाबाजानी दुर्रांनी यांनी आखलेली रणणिती प्रचंड यशस्वी होत असल्याचे ही विटेकरांनी सोशल मिडियात प्रचारात घेतलेल्या आघाडी वरुन स्पष्ट होत आहे.

साईबाबा च्या चरणी नतमस्तक होऊन परिवर्तन यात्रेस प्रारंभ - राजेश विटेकर


श्रीसाई जन्मस्थळी (पाथरी) साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत परिवर्तन यात्रेला आजपासून सुरूवात केली. 

परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक शहरात, जास्तीत जास्त गावात, वाड्या वस्त्या तांड्यावर जाऊन शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचून परिवर्तनाची साद घालणार आहे, परिवर्तनाच्या लोकचळवळीत योगदान देण्याचं आवाहन करणार आहे.आता परभणी लोकसभा मतदार संघातील मतदार जागृत झाले आहेत.त्याना सर्व काळाले आहे.परभणी लोकसभा मतदार संघाचा विकास करावयाचा आहे.या परिवर्तनाच्या लढाईत सर्वांचीच साथ मला मिळाली आहे असे राजेश विटेकर म्हणाले.

No comments:

Post a Comment