तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 March 2019

परळीत सोमवार पासून आघाडीच्या नेत्यांचा संयुक्त प्रचार दौरा


बजरंगबप्पांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे, टी.पी.मुंडे व संजय दौंड यांचा परळी तालुक्यात संयुक्त प्रचार दौरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.31...............बीड लोकसभा आघाडीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारार्थ उद्या दि.01 एप्रिल रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस टी.पी.मुंडे, व कॉंग्रेसचे युवक नेते संजय दौंड हे संयुक्त प्रचार दौरा करणार आहेत.

सकाळी 08 वा दाऊतपूर, 09 वा संगम, 10 वा वागबेट, 11 वा ब्रम्हवाडी, दुपारी 12 वा इंदपवाडी, 01 वा जिरेवाडी, 04 वा तळेगांव, सायंकाळी 05 वा टोकवाडी, 06 वा भोपला, 07 वा कन्हेरवाडी आदी ठिकाणी बैठका घेणार आहेत.

या दौर्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे प्रचार संपर्क कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a comment