तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

सामाजिक जाणिवेतून केलेली सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते -: छगन शेरे

सबलाईन-:
परभणीत जगदंब परिवाराकडून रुग्णवाहिकेचे लोकार्पण व रक्तदान शिबिर संपन्न 

परभणी / प्रतिनिधी
सामाजिक जाणिवेतून केलेली कुठलीही सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असते.आणि जो घटक समाजाची अशी सेवा करतो तो ख-या अर्थाने समाजसेवक असतो असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे यांनी केले.
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जगदंब परिवाराच्या वतिने शनिवार दिनांक 16 मार्च रोजी रूग्णवाहिकेचे लोकार्पण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून छगन शेरे बोलत होते.
सामाजिक बांधिलकी जपत जनसामान्यांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून जगदंब परिवाराने समाजात वेगळी ओळख निर्माण केली असुन या परिवाराचा प्रत्येक सदस्य हा लोकभावना ओळखून काम करत असल्याचे ते म्हणाले 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदंब परिवाराचे डाॅ.निलेश दळवे हे होते तर प्रमुख उपस्थितीत.
डाॅ.अभिजित चिद्रवार,डाॅ.यौगेश तोडकरी,रामेश्वर आवरगंड,डाॅ.सुधीर काकडे,डाॅ.अनिल उमाटे,डाॅ.अमोल मेटे,डाॅ.राजगोपाल कालानी,डाॅ.रामप्रसाद पवार,डाॅ.रामेश्वर नाईक,डाॅ.संदिप तंवर,डाॅ.अनिल आहेर,डाॅ.विवेक कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डाॅ.राजगोपाल कालानी,डाॅ.अभिजित चिद्रवार,डाॅ.सुधीर काकडे यांनी मनोगतं व्यक्त केली तर अध्यक्षीय समारोप डाॅ.निलेश दळवे यांनी केला.
यावेळी बालाजी मोहिते यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अमित सोळंके, सुत्रसंचालन सचिन गायकवाड तर आभार डाॅ.प्रभाकर नरवाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश(आबा) पाटील, डाॅ.प्रभाकर नरवाडे,डाॅ.गणेश हारकाळ,डाॅ.परमेश्वर पाटील,डाॅ.श्रीकृष्ण शेंगुळे,प्रा.अमित सोळंके,रवी दमकोडवार,केशव डाके,अमोल नरवाडे,गोरख मोहिते, सचिन वाघ, राजु चापके,पांडुरंग दुधाटे ,डाॅ.गजानन कानडे,डाॅ.मुरलीधर शिंदे,डाॅ.प्रशांत मस्के,किशन कारकर,अमोल अवकाळी,कैलास लोडे,
यांच्यासह जगदंब परिवाराच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment