तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 March 2019

अस्मिता चाईल्ड केअर सेंटरमध्ये महिला दिन ऊत्साहात साजरा
फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
वाशिम-काटा रोडवरील अस्मिता चाईल्ड केअर सेंटर येथे राष्टीय पाळणाघर या योजनेअंतर्गत विविध ऊपक्रम घेवुन दि.८मार्च रोजी जागतीक महिला दिन साजरा करन्यात आला.
           महिला दिनाचे औचित्य साधत वाशिम येथील अस्मिता चाईल्ड केअर सेंटर येथे राष्टिय पाळणाघर योजनेअंतर्गत महिला दिन उत्साहात साजरा केली.या प्रसंगी शुभ्रा चोपडे,स्वरा जाधव,स्वामीणी देशमुख,गौरी गोट आदी चिमुकल्या मुलींनी  साविञीबाई फुले,जिजामाता,अहिल्यादेवी होळकर,राणी लक्ष्मिबाई,लक्ष्मीबाई केळकर आदींच्या वेषभुषा साकारुन शिक्षणाचा संदेश दिला.भुमिका कांबळे,निरजा मोनात,मुक्ता जाधव या मुलींनीही आपली वेगळी चमक दाखवत भुमिका साकारल्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली अर्चना नराळ तर प्रमुख अतिथी म्हणून प्राची जोशी,स्वाती चोपडे,सुधा जाधव,अनिताबाई यांची ऊपस्थीती होती.मान्यवरांनी सामाजीक कार्यासाठी झटणार्‍या महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकत स्ञीशिक्षणाविषयी महिलांनी पुढाकार घ्यावा असे मतही व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुञसंचलन मनिष घुगे पर आभार पाळणा घराच्या संचालिका सुधा जाधव यांनी मानले.चिमुकल्यांच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सांगता करन्यात आली.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment