तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

वाघाळा,विटा,फुलारवाडी , कुभारी, वांगी या गावांना कॅनॉलचे पाणी पोहचेना;राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चा जलसमाधी आंदोलनाचा इशारा


प्रतिनिधी

पाथरी:-,तालुक्यातील मुदगल, वाघाळा,विटा,फुलारवाडी , कुभारी, वांगी,लिंबा  या गावांना अद्यापही जायकवाडीच्या  कॅनॉलचे पाणी मिळाले नाही दोन  दिवसात पाणी शेवट पर्यंत पोहचवा  अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शेतक-यांना  सोबत घेऊन जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा जायकवाडीच्या उपविभाग क्र ६ च्या उप अभियंत्यास शुक्रवार १माररे रोजी निवेदना व्दारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील बी ५९ क्रमांकाच्या चारीला महिणा भरा पासून पाणी सुरू आहे.मात्र आपल्या ढिसाळ नियोजना मुळे, मुदगल, वाघाळा, फुलारवाडी, लिंबा,विटा,वांगी आणि कुंभारी या गावातील शेतक-यांनी पहिल्या पाण्यावर पेरणी केलेल्या ज्वारी साठी आता गरज असतांना पाणी मिळत नसल्याने हे पिक हातचे जाणार आहे. पाऊस नसल्याने या भागातील शेतक-यांनी  पाटाच्या पाण्यावर शेत ओलाऊन पेरणी केली होती.आता ज्वारी पोट-याच्या  अवस्थेत असल्याने पाण्याची अत्यंत गरज आहे.या बरोबरच पाथरी तालुक्याच्या याभागात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणी पातळी कमालीची खालावली असून पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट असून या वेळी या भागात पाणी नाही गेल्यास गंभिर प्रश्न निर्माण होणार असून वरील गावांना नियोजन करून पाणी सोडावे. जागोजागच्या चा-या  बंद करून पाणी शेवट पर्यंत पोहोचण्या साठी आपल्या कर्मचा-यां  मार्फत उपाय योजना कराव्यात. पाणी बंद होणा-या  साठी दोन तीन दिवस राहीले तरी अद्याप आपले कुठलेही नियोजन दिसून येत नाही. पाथरी तालुक्याचा नेमका हाच भाग तिव्र दुष्काळी भाग म्हणून पाहीला जातोय या भागात सरासरीच्या पन्नास टक्के हुन कमी पाऊस झालेला आहे. खरीप आणि रब्बही हातची गेली असतांना काही अशी ज्वारीचे पीक हाती लागुन मानसांचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या पाणी पाळी मुळे सुटू शकतो असे शेतकरी सांगत आहेत.मात्र दर वेळी जायकवाडी उपविभाग पाथरी कडून वरील गावांसाठी सवतासुभा केला जात असल्याची भावना शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे.त्या मुळे शनिवार २ मार्च पर्यंत वरील गावां साठी त्वरीत पाणी सोडावे अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तीन मार्च रोजी शेतक-यांना  सोबत घेऊन जल समाधी आंदोलन करेल याची गांभिर्यांने  नोंद घ्यावी असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुका  अध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांनी निवेदना व्दारे दिला आहे.या वेळी पं स सदस्य अजय थोरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू काळे आणि शेतक-यांची  उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment