तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

वंजारी सेवा संघ महिला प्रदेश अध्यक्षा स्व.सविताताई घुले यांना मान्यवरांची औरंगाबाद येथे श्रध्दांजली अर्पण

औरंगाबाद ( प्रतिनिधी) :- 

अतिशय सक्रिय सामाजिक व राजकिय व्यक्तिमत्व,वंजारी समाजातील महिलांचे राज्यपातळीवर पहिले प्रभावी संघटन उभे करणार्‍या,भारतीय जनपा पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चा बिड जिल्हा प्रभारी अाणि वंजारी सेवा संघ महिला अाघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सविताताई घुले,त्यांचे पती विलासजी घुले,शिक्षण क्षेत्रात ज्यांनी अापल्या कार्याची ओळख निर्माण केली होती असे संत भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.मदनरावजी ढाकणे सर अाणि गाडीचे चालक बकाल पाटीलयांचे दि.२५ फेब्रुवारी २०१९ रोजी अतिशय दुर्देवी अपघातात दुख:द निधन झाले.
यांच्या अाकस्मात जाण्यामुळे त्यांचे कुटुंबिय, समाज,संघटना यांना अतीव दुःख झाले आहे. या सर्व दिवंगत व्यक्तिमत्वांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी,त्यांच्याप्रती शोक व्यक्त करण्यासाठी श्रध्दांजली सभेचे         
रविवार दि.०३मार्च,२०१९,सकाळी ठिक ९:३० वा.वंजारी समाज मंगल कार्यालय,पुंडलीक नगर रोड,पाण्याचा टाकी जवळ,एन -4 सिडको,औरंगाबाद येथे अायोजित करण्यात अाली होती. या प्रसंघी उपस्थित मान्यवरांनी अापल्या भावना व्यक्त केल्या.

अतिशय तळमळीची,पक्षावर व समाजावर नितांत श्रध्दा असलेल्या सविता घुले यांच्या अाकस्मात अपघाती निधनाने समाजाची प्रचंड हानी —ना.डाॅ.भागवत कराड.

समाजासाठी व पक्षासाठी प्रामाणिक कार्य करणार्‍या सविताताई यांच्या निधनाने समाजाचे कधिही न भरुन येणारे नुकसान —श्री.संजयजी केणेकर

सविताताई यांच्या निधनाने वंजारी सेवा संघ परिवार पोरका झाला अाहे तर प्रा.मदन ढाकणे यांच्या निधनाने समाज एका अत्यंत तळमळीच्या व्यक्तिमत्वाला मुकला अाहे.
—श्री.अनिल फड.

अत्यंत संयमी अाणि समाज व संघटनेवर निस्वार्थी प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सविताताई 
—प्राचार्य डाॅ.खुशाल मुंढे

सविताताई यांच्या अाकस्मात निधनाने एका उत्तम महिला संघटकाला संघटना मुकली
—पुरुषोत्तम काळे

सविताताई च्या अपघाती निधनाने एक मार्गदर्शक व जिवलग मैत्रीनीची अायुष्यात कधिही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली अाहे
—मनिषाताई भन्साळी

मुंडे साहेब,पंकजाताई,प्रितमताई नव्हे संबंध मुंडे घराण्यावर निस्वार्थ प्रेम करणार्‍या, सयंमी,मान,अपमान याचा अायुष्यात कधिही विचार न करता सतत कार्य करणार्‍या सविताताई यांचा स्वभाव अायुष्यत सदैव स्मरणात राहील.त्यांच्या कुटूंबासोबत अाम्ही सदैव असू
—सतिश नागरे

समाजासाठी सतत धडपडणारे,महिलांचे संघटन उभाकरुन त्यांना व्यासपीठ निर्माण करुन देणार्‍या सविताताई तथा जालना येथुन येऊन शिक्षण क्षेत्रात स्वत:चे,समाजाचे नाव ज्वल करणारे अतिशय दिलदार असे स्व.मदन ढाकणे अामच्या कायम स्मरणात असतील
—अॅड.संजयजी काळबांडे

यांच्या सहित उपसस्थित विविध मान्यवरांनी विविध अाठवणी,सामाजिक योगदान याबद्दल शोक व्यक्त केला व श्रध्दांजली अर्पण केली.
सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात कार्यरत सामान्य कार्यकर्त्याच्या मृत्युनंतर पहिल्यांदाच अशी श्रध्दांजली सभा घेतल्याबद्दल मान्यवरांनी एक चांगली व नितांत गरज असलेली परंपरा चालू केल्याबद्दल संघटनेप्रती समाधान व्यक्त केले.
या श्रध्दांजली कार्यक्रमासाठी ना.डाॅ.भागवतजी कराड साहेब (अध्यक्ष,मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ),भाई श्री.ज्ञानोबा मुंढे (प्रदेशाध्यक्ष,भाजपा किसान मोर्चा), मा.श्री.संजयजी केनेकर(प्रदेशाध्यक्ष,भाजपा कामगार मोर्चा),ह.भ.प.ज्ञानेश्वर(दादा) महाराज अाप्पेगांवकर,श्री.अनिल फड (प्रदेशाध्यक्ष,वंजारी सेवा संघ),भाजपा नेते मा.श्री.सतिशजी नागरे,प्राचार्य डाॅ.खुशालजी मुंडे(प्रदेश कार्याध्यक्ष,वंजारी सेवा संघ),मा.उपमहापौर श्री.भाऊसाहेब ताठे,श्री.धनंजय ओंबासे(अध्यक्ष,भटके विमुक्त हक्क परिषद/प्रदेश उपाध्यक्ष,भाजपा भ.वि.अाघाडी),श्री.पुरुषोत्तम काळे (रा.अध्यक्ष,अ.भा.वं.सेवा संघ),डाॅ.उज्वलाताई दहिफळे,सौ.विमल केंद्रे(नगरसेविका), सौ.मनिषाताई भन्साळी(शहराध्यक्षा,भाजपा महिला मोर्चा),श्री.मनिषाताई मुंडे(नगरसेवक), श्री.गोविंद केंद्रे(भाजपा शहर सरचिटणीस),
अॅड.संजयजी काळबांडे(जालना जि.प.सदस्य/अध्यक्ष,बाल कल्याण समिती जालना तथा वंजारी सेवा संघ मराठवाडा विभाग उपाध्यक्ष),श्री.बालाजी मुंडे,सौ.इंदुमती अाघाव(प्रदेश उपाध्यक्षा,वं,से.संघ महिला अाघाडी), सौ.अर्चना धात्रक(प्रदेश सचिव,महिला अाघाडी),हरिश्चंद्र घुगे (शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडी),प्राचार्य श्रीनिवास दराडे (प्रदेशाध्यक्ष,वंजारी युवक संघटना), डाॅ.चौरे( शहराध्यक्ष,वं.से.संघ जालना), अॅड.रेणुका घुले,अॅड.सुभाष मुंडे,श्री.राजु सानप,श्री.प्रतिक गोसावी(युवा सचिव,भ.वि.ह.प.),श्री.रामदास फड,यांनी उपस्थित राहुन श्रध्दांजली अर्पण केली.

या श्रध्दांजली सभेचे नियोजन वंजारी सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस डाॅ.गणेशजी अाव्हाड,महिला मराठवाडा विभाग अध्यक्षा सौ.मनिषाताई मुंडे,श्री.अानंद वाघ,कार्यालय व प्रसिध्दिप्रमुख श्री.रविंद्र जायभाये,प्रदेश कोषाध्यक्ष श्री.उध्दवजी ढाकणे,संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री.प्रशांतजी डिघुळे,युवा जिल्हाध्यक्ष श्री.राजेश डिघुळे,युवा शहर अध्यक्ष अभिजित गरकळ,गुलाब घोळवे यांनी केले होते.

No comments:

Post a Comment