तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

पालम तालुक्यात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत


अरुणा शर्मा

पालम - तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा सुरू असून इयत्ता 12 वी ची चार केंद्रावर तर 10 वी ची सहा केंद्रावर 1469 विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती परिरक्षक एन.व्ही.पोले यांनी दिले.
   पालम तालुक्यात इयत्ता बारावीची चार केंद्र आहेत. ममता विद्यालय पालम येथे केंद्रप्रमुख शशीकांत गायकवाड, प्रशाला पालमचे केंद्र प्रमुख सरोदे, संत गाडगेबाबा महाविद्यालय मार्तंडवाडीचे केंद्रप्रमुख एस.यू.मोहजकर तर जय भवानी उच्च माध्यमिक आश्रम शाळा मोजमाबाद येथे बी.टी.राठोड हे केंद्र प्रमुख आहेत. इयत्ता दहावीचे प्रशाला पालम केंद्र प्रमुख सरोदे असून 250 विद्यार्थी आहेत. ममता विद्यालय पालम केंद्र प्रमुख शिवाजीराव आंबोरे सह केंद्रप्रमुख बी.एस.आचार्य आहेत. येथे 295 विद्यार्थी परीक देत आहेत. प्रशाला पेठशिवणी येथे केंद्रप्रमुख सय्यद हे आहेत. 251 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बळीराजा माध्यमिक विद्यालय मरडसगाव येथे केंद्रप्रमुख कोरडे हे असून 228 विद्यार्थी परीक्षार्थ आहेत. नाईक विद्यामंदिर चाटोरी येथे आगलावे केंद्र प्रमुख असून 295 विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय बनवस येथे 187 विद्यार्थी परीक्षा देत असुन 1469 विद्यार्थी परीक्षा देता आहेत. ममता विद्यालय पालम येथे परीक्षक कार्यालय असून येथे सह परीक्षक एस.के.रोडे, जी.पी.नागरगोजे, डी.जे.खंदारे, एस.एम.कांबळे, यु.बी.कुंजटवाड, जे.जे.बोखळे आदी कर्मचारी काम करत आहेत.

No comments:

Post a Comment