तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

मंगरुळपीर तालुकाध्यक्ष पदी प्रा.नंदलाल पवार यांची सर्वानुमते निवड
वाशिम दि.१२:(फुलचंद भगत,जिल्हा प्रतिनिधी)अ.भा. मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्नित वाशिम जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या  मंगरुळपिर तालुका अध्यक्ष पदी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी व जेष्ठ समाजसेवक प्रा.नंदलाल पवार  यांची सर्वानुमते आज शलु बाजार येथे जिल्हा कार्यकारणीच्या बैठकी मध्ये माझी राज्यध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव आंभोरे हस्ते व संघटनेचे मुंबई  प्रदेश प्रतिनिधी शिखरचंद बागरेचा,कार्याध्यक्ष अजय ढवळे, वाशिम शहराध्यक्ष मदन देशमुख,व तत्कालीन तालुकाध्यक्ष मोहनभाऊ राऊत,सुभाषराव हातोलकर,नाना देवळे,राजेश दबडे,शरद येवले,सुनिल भगत,वनमाला पेंढारकर,डाॅ.सुधाकर क्षिरसागर,अमोल रघुवंशी,राजकुमार ठाकुर,पवन राठी आदींच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.यावेळी मंगरुळपिर तालुका कार्यकारणी सदस्य तथा  तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पञकारांना न्याय मिळवुन त्यांच्या लेखणीला बळ देन्याचे सदैव कार्य करीत राहिन तसेच संघटनेच्या माध्यमातुन विधायक व समाजपयोगी ऊपक्रम राबवून संघटना वाढीसाठी प्रयत्न करेल तसेच लवकरच मंगरुळपीर तालुका कार्यकारीणी लवकरच घोषीत करणार असल्याचे मत नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रा.नंदलाल पवार यांनी व्यक्त केले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment