तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 March 2019

आमची लढाई भाजपा बरोबरच काँग्रेस,राष्ट्रवादीशी- प्रा.विष्णू जाधव


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) ः- 
वंचित बहुजन आघाडी समाजातील वंचित जातीबरोबरच मायक्रो ओबीसी व मुस्लिमांना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली असुन आमची लढाई ही भाजपा बरोबरच काँग्रेस राष्ट्रवादीशी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे संभाव्य उमेदवार प्रा.विष्णू जाधव यांनी सांगीतले.
वंचित बहुजन आघाडी च्या वतिने आज दि.11रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी ची भुमिका विषद केली.संविधानाचे संरक्षण करणार्या सोबत आम्ही असल्याचे सांगुन आमचे आत्तापर्यंत 50 टक्के उमेदवार जाहिर झालेले असुन बीड जिल्ह्यात आमची प्रचाराची एक फेरी पुर्ण झाल्याचे सांगीतले. वरिष्ठ पातळीवर समविचारी पक्षांच्या आघाडीसाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या बोलण्या सुरु आहेत. तसेच जातीचे सर्व समिकरण जुळवून आम्ही सर्व जातीतील कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी मिलिंद घाडगे यांनी प्रास्ताविकात वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्या पाठीमागची भुमिका सविस्तर पणे मांडुन येणार्‍या लोकसभेत प्रा.विष्णु जाधव यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न शिल राहणार आहेत. तसेच एम.आय.चे तालुकाध्यक्ष कादर कुरेशी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासोबत आमचा पक्ष तणमण धनांने सोबत असल्याचे सांगितले.  येत्या काही दिवसात बीड जिल्ह्यात बाळासाहेब आंबेडकर व एआयएम चे असुदद्दीन औवेसी यांच्या सभा होणार असल्याचे यावेळी सांगितले.या पत्रकार परिषदेस  भारिपचे जि.अ.प्रा.बळीराम सोनवणे,जि.महासचिव मिलींद घाडगे,एआयएम चे ता.अ.कादर कुरेशी,शहराध्यक्ष इजाज खॉ.पठाण,वंचित आघाडीचे ता.अ.भीमराव सातपुते,भारिपचे ता.अ.गौतम साळवे,श.अ.संजय गवळी,जेष्ठ नेते एन.के.सरवदे,हमीद खॉ पठाण,साहेब दरोडे,प्रसेनजीत रोडे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment