तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

गेवराईतील अनमोल शाळेत विविध उपक्रमाद्वारे कार्यक्रमाची सांगतासुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. २ __ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या अर्थात गेवराई शहरातील अनमोल प्राथमिक विद्यालयात विविध व उपयुक्त असे उपक्रम घेण्यात येऊन या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ज्ञानिक मेजवानी मिळाल्याचा आनंद उपस्थितांत बहरला.
          गेवराई शहरातील अनमोल प्राथमिक विद्यालय याठिकाणी शाळेच्या संस्थापिका अध्यक्षा वैशाली सुरेशराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 'मराठी राजभाषा दिन' हा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गेवराई येथील वैद्यनाथ बँकेचे शाखाधिकारी देशमुख, शाळेेेच्या कार्यवाहीका सौ. शिल्पा घोटनकर, सन्माननीय सदस्य प्रशांत घोटनकर यांनीही यावेळी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले तसेच या संपन्न झालेल्या कार्यक्रमप्रसंगी वैशाली देशमुख यांनी विविध विषयावर आपले महत्त्व पटवून दिले. शाळेच्या संस्थापिका अध्यक्षा वैशाली देशमुख यांनी अत्यंत सरळ समजून घेणाऱ्या कथेद्वारे अनन्य प्रकारची उदाहरणे देत 'मराठी भाषेचे' महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. मराठी भाषेला सर्वोत्तम स्थान मिळावे व सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. राष्ट्रीय 'विज्ञान दिन' हा देखील या शाळेमध्ये साजरा करण्यात आला. विज्ञानाशी संबंधित विविध प्रयोग येथील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात दाखविण्यात आले. उदाहरणार्थ कापूर पाण्यावर तरंगणे, मेणबत्तीच्या आरशातील प्रतिमा ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता तसेच सोडियम बाय कार्बोनेटमुळे कार्बनडाय -ऑक्साईड प्रसरण पावतो, क्षारामुळे पाण्यात वस्तू तरंगते आदी विषयी ज्ञानाची माहिती करून देण्याचा शाळेचा प्रयत्न राहीला. दरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत सर्व भारतभर हळद दुःख व्यक्त होत असताना अचानक आपल्या भारतीय जवानांनी एयर सट्राईकद्वारे पाकिस्तानी आतंकवादावर हल्ला चढवून जो 'विजय' मिळवला याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील भारतीय सैनिकांचे अभिनंदन करून आनंद साजरा केला.
       दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून देशप्रेम विषयी भावना जागृत केली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक व्ही. एन. रुपनर तसेच शिक्षिका सर्वश्री राणी पिंपळे, एस. डी. काकडे, खांडके सर, एस. आर. परदेशी, पी. पी. पाठक, व्ही. व्ही. मिसाळ, देशपांडे मॅडम, कुलकर्णी मॅडम आदींनी परिश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment