तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 March 2019

कर्जाची मंजुर रक्कम मागणीस गेल्या शेतकर्‍यांना बँक व्यवस्थापकाची आपमानास्पद वागणूक पोलिस ठाण्यात दिला तक्रार अर्ज
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.19
    बँक ऑफ महाराष्ट्राच्या मोंढा मार्केट शाखेच्या व्यवस्थापकाने अर्वाच्च भाषेत शिवागाळ करुन फाईल मधील जबरदस्तीने पिक कार्जाचा फॉर्म काढुन घेऊन बाकी फाईल अंगावर फेकुन दिल्याचा तक्रार  अर्ज परळी तालुक्यातील मांडवा येथील शेतकरी उध्दव विक्रम चाटे यांनी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात दिला आहे. 
    ड्रिप (ठिबक) कर्ज प्रकरणातील रक्कम मागाण्यांसाठी उध्दव चाटे हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या येथील सुभाष चौक रोडवरील शाखेत गेले होते. चाटे यांनी बँकेच्या व्यवस्थापकांना माझी जमीन ठिंबक योजने अंतर्गत बागायती करण्यासाठी कर्ज मागणी केली. त्याप्रमाणे सदरचे कर्ज रक्कम 1 लाख 10 हजार रुपये मंजुर करुन मला बँकेच्या व्यवस्थापकानी माझ्या नावावरील जमीनीचे गहाण खत करण्याबाबत कळविले. त्याप्रमाणे 14 फेबु्रवारी 2018 रोजी घाण खत दस्तावेजाची नोंद केली. त्यांनी आजतायगायत  दोन महिने टोलावा टोलवी करुन रक्कम दिली नाही. अशी तक्रार चाटे यांनी दिली. 
    मंजुर झालेल्या कर्ज रक्कमेची मागणी करताच बँकेच्या व्यवस्थापकाने आपमानस्पद वागणुक दिली. जर कर्ज रक्कम नाही दिली तर नाईलास्तव आत्महत्या करण्यात येईल असा इशारा ही उध्दव चाटे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती पोलिस व महसुल प्रशासनास पाठविण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment