तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

परळीच्या बाजारात मेथीची भाजीचा तुटवडा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळीच्या भाजी बाजारात मागील आठवडाभरापासून मेथीची भाजी मिळत नसल्याने पालेभाजी खाणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुरेसे पाणी नसल्याने मेथीच्या भाजीचा तुटवडा असून आता मेथी बाजारात दुर्मिळच होईल असेच दिसते.
शरीराच्या दृष्टीकोनातून पालेभाज्यांचे मोठे महत्व आहे. त्यातही मेथीला सर्वस्तरातून अधिक मागणी होतांना दिसते. परंतू मागील आठवडाभरापासून परळीच्या आठवडी बाजारात मेथीची भाजी फारशी दिसून येत नाही. सध्या पालेभाज्या वाढीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने भाजीची टंचाई दिसून येते. याबाबत संगम येथील शेतकरी अरूण नागरगोजे यांना विचारले असता सध्या मेथीचा सिझन संपत आला असून येत्या काही दिवसात फारशी मेथी ग्राहकांना मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या उन्हाळयाचे दिवस असून मेथीच्या भाजीसाठी भरपूर पाणी आवश्यक असते. उन्हाळा व पाणी टंचाई लक्षात घेता मेथीची लागवड आता फारशे शेतकरी करीत नसल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a comment