तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

२ व ३ मार्च २०१९ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबीर


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूका २०१९ विचारत घेऊन मतदार नोंदणी झाली नाही अश्या वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणुन वोटर हेरीफीकेशन आणि महिती या कार्याकर्मा अंतर्गत मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शनिवार आणि रविवार या सुट्याच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी विशेष मोहीमेचा  २ व ३ मार्च रोजी सर्व मतदान केंद्रावर व मतदान केंद्राच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे
ज्या मतदारांचे १ जानेवारी २०१९ रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट नाही अशा मतदारांनी नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, मतदार यादीतील नाव वगळणीकरीता नमुना ७, मतदार यादीतील नोंद दुरुस्त करण्यासाठी नमुना ८ व एकाच मतदार संघात एका मतदान केंद्रातून दुसऱ्या मतदान केंद्रात नाव स्थलांतरीत करण्यासाठी नमुना ८ अ भरुन देण्यात यावा. या मोहिमेत प्राप्त होणारे अर्ज ७ मार्चपर्यंत निकाली काढण्यात यावेत, अशा आयोगाच्या सूचना आहेत. जनतेने या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा.
तेव्हा मतदार नोंदणी झाली नाही.अश्या वंचित नागरिकांनी सदर मोहिमे अंतर्गत नाव नोंदणीसाठी आपले अर्ज मतदान केंद्रावर / मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रीयस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा सहाय्यक मतदार नोंदणी कार्यालय (तहशील कार्यालय ) किंवा मतदार नोंदणी अधिकारी (उपविभागीय कार्यालय ) येथे सादर करावेत 
कसे पाहणार आपले नाव यादीत आहे का नाही ते असं पाहा.
सर्वप्रथम आपले नाव पाहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://ceo.maharashtra.gov.in/या साईटवरही आपलं नाव पाहाता येईल.
इलेक्शन कमिशनच्या साईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर ‘Name Wise’ आणि ‘ID Card Wise’ हे दोन पर्याय उपलब्ध असतील.त्यातील ‘Name Wise’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे ‘District’ आणि ‘Assembly’  असे दोन पर्याय समोर येतील.त्यापैकी ‘Assembly’ हा पर्याय निवडल्यास तुम्हाला पुढे चार पर्याय पुढे येतील. ते सर्व पर्याय तुम्हाला भरावे लागतील.त्यामध्ये पहिला पर्याय असेल तो ‘Select District’. त्या पर्यायात तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.त्या पुढचा पर्याय ‘Select Assembly’. म्हणजेच तुमचा मतदारसंघ. त्या पर्यायापुढे तुमच्या मतदारसंघांचे नाव निवडा.त्यानंतर तुमचे नाव टाका.त्यानंतर तुमचे आडनाव टाका.त्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाका.हे सर्व रखाने भरल्यानंतर ‘Search’ या पर्यायवर क्लिक करा.ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमचे नाव, तुमचा मतदार क्रमांक, वय याबाबतची माहिती समोर येईल. याशिवाय तुम्हाला तुमचं मतदान केंद्र पाहायचे असल्यास त्या पर्यायातील Polling Station Address यावर क्लिक करा. त्यांनंतर तुम्हाला तुमच्या मतदार केंद्रांची माहिती उपलब्ध होईल. याशिवाय तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचे नावही पाहाता येणार आहे.ही संपूर्ण प्रक्रिया पार केल्यानंतरही नाव न आल्यास, नावाची स्पेलिंग पुन्हा एकदा चेक करा. लक्षात ठेवा की, सर्च करताना तुमचं नाव आणि उर्वरित तपशील इंग्रजीत भरावयाचा आहे.

No comments:

Post a Comment