तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आयोजित भाजप विजयी संकल्प रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा-भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-  ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या उद्याला शहरात भाजपच्या वतीने ‘विजयी संकल्प रॅली’ काढण्यात येणार आहे.या रॅलीत भाजपा कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी केले आहे.
   केंद्र व राज्य सरकारने जनहितासाठी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रदेश पातळीवरून विविध कार्यक्रम राबविण्याचे सूचित करण्यात आले आहे, त्याचाच एक भाग म्हणून येत्या 3 मार्च रोजी प्रत्येक विधानसभा  मतदारसंघात ही ’विजयी संकल्प रॅली’ भाजपच्या वतीने काढण्यात येणार आहे. परळी शहरात पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी 4 वा. गोपीनाथ गडावरील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेवून ही रॅली निघणार आहे. ही रॅली पुर्णपणे बाईक रॅली असून यात मतदारसंघातील दहा हजार मोटरसायकल सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. तरी या रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment