तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

लोणारवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न


परळी-वैजनाथ  (प्रतिनिधी) :- 
अखंड हिंदुस्थानचे आराद्य दैवत तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परळी वैजनाथ तालुक्यातील लोणारवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
  लोणारवाडी येथे दर वर्षी मावळा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करून शिवजयंती साजरी केली जाते.या वर्षी देखील शिवप्रतिमेचे पुजन व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करत भव्य मिरवणुक काडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी, राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवजी महाराज, क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. प्रतिमापूजनानंतर भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून ढोल-ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी,छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगन भेदी घोषणा देत भव्य मिरवणुक काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच नवनाथ मुंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते मुन्ना बागवले, उप सरपंच कुंडलिक कोळेकर, सुरेश नानवटे,बजरंग औटी,रवि गित्ते हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मावळा शिवजयंती उत्सव समिती बबन ढेंबरे, नागनाथ तुपसैवदंर, अंबाजी अटपळकर,जोतिबा ढेंबरे, बाळासाहेब ढंगेकर, संजय अटपळकर,संतोष कोळेकर, कैलास तुपसैवदंर,जगन्नाथ तुपसैवदंर,पप्पू ढेंबरे, राम अटपळकर,बाळासाहेब तुपसैवदंर,सोमनाथ खांडेकर,
सुभाष पवार, तुकाराम धनगर, कैलास गव्हाणे,सुरेश धनगर, संतोष अटपळकर यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a comment