तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

पाथरीत नाफेड खरेदी केंद्रावर लाचखोर ग्रेडर पैसे फेकून पळालाग्रेडर अनिल कांबळे वर गुन्हा दाखल करण्यीची शेतक-यां कडून मागणी

प्रतिनिधी
पाथरी:-पाथरी-माजलगाव  महामार्गा वर आष्टी फाट्या जवळ नाफेड कडून तुर खरेदी केंद्र सुरू असून दोन तीन दिवसा पासून येथे तुरीची खरेदी सुरू असून या ठिकाणी असलेला ग्रेडर शेतक-यां  कडून प्रति क्विंटल दोऩशे रुपयांची मागणी करून तुर खरेदी करत असल्याचा प्रकार मंगळवारी जागरूक शेतक-यांनी  उडघ करताच संबधीत ग्रेडर शेतक-यां  कडून घेतलेले पैसे अक्षरश:  फेकून देऊन खरेदी केंद्रावरून पळून गेला या विषयी शेतक-यांनी  पाथरीचे उपविभागिय अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित अनिल कांबळे नावाच्या ग्रेडरवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पाथरी तालुक्यातील शेतक-यांच्या  तुरीची खरेदी स्वस्तिक सुशिक्षित बेरोजगार संस्था पाथरी यांच्या वतिने नाफेडची तुर खरेदी सुरू असून या ठिकाणी ग्रेडर म्हणून अनिल कांबळे हे कार्यरत आहेत. मंगळवार ५ मार्च रोजी हादगाव येथील प्रशांत सुधाकरराव नखाते, प्रल्हाद देविदासराव नखाते यांनी या खरेदी केंद्रावर तुर विक्री साठी आणली असता कांबळे यांनी खराब तुर आहे आम्ही खरेदी करू शकत नाही.या नंतर कांबळे यांनी या शेतक-यांना  बाजुला घेऊन सांगितले की मी तुर खरेदी करतो मात्र दोनशे रुपये प्रतिक्विंटल ने मला पैसे द्यावे लागतील. मालउच्च प्रतीचा असतांनाही ग्रेडर पैसे मागत असल्याची माहिती या शेतक-यांनी किसान सभेचे दिपक लिपने यांना माहिती दिली आणि हा सौदा ठरल्या नंतर दिपक लिपने आणि काही पत्रकार यांना मालाचे वजन झाल्या नंतर नेमके अनिल कांबळे हे शेतक-यां  कडून पैसे घेत असतांना दिसले या वेळी हा प्रकार अंगाशी अल्याचे लक्षात येताच अनिल कांबळे यांनी खरेदी केंद्राच्या दारात पैसे फेकून देत तेथुन पलायन केले.या नंतर संबंधीत संस्थेचे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले.या विषयी जिल्हामार्केटींग फेडरेशनचे कपुरे यांना विचारणा केली असता हा प्रकार अतिषय गंभिर असून संबंधीताला काढून टाकण्याची कार्यवाही सुरू असून आपण लागलीच कार्यवाहीचे पत्र टाईप करत असल्याचे त्यांनी तेजन्यूजहेडलाईन्स शी बोलतांना सांगितले. पाथरी तालुक्यात या वर्षी दुष्काळ आहे. अतिषय मोजक्या शेतक-,यांनी दिवस रात्र मेहनत करून पाणी देत पिके जोपासली आहेत.एकी कडे शेतमालाला भाव नाहीत.दुसरी कडे उशिराने खरेदी केंद्र सुरू आहेत या ठिकाणी माल घातल्यास शासनाचे पैसे ही लवकर मिळत नाहीत. आणि माल विक्री साठी आणल्यास अशा प्रकारे शेतक-यांची  अर्थीक आणि माणसिक पिळवणूक होत असल्याची प्रतिक्रीया दिपक लिपने यांनी दिली.ग्रेडर अनिल कांबळे वर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल करावा अन्यथा या विरोधात उपविभागिय अधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा भाकपा (मार्क्सवादी) चे कॉ दिपक लिपने, कॉ लिंबाजी कचरे पा़टील, कॉ सुभाष नखाते, कॉ भागवत कोल्हे, कॉ गोकूळ शिंदे, कॉ हनुमान नखाते, कॉ विष्णू नखाते, कॉ प्रशांत नखाते यांनी उपविभागिय अधिकारी पाथरी यांना निवेदना व्दारे दिला आहे.

No comments:

Post a Comment