तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

रोशनी मांडे उत्कृष्ट गटप्रवर्तक पुरस्काराने सन्मानित


फुलचंद भगत
मंगरुळपीर ता ८/(जिल्हा प्रतिनिधी) तालुक्यातील मोहरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रोशनी मांडे यांना  उत्कृष्ट गटप्रवर्तक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ता ६ रोजी वाशीम येथे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गटप्रवर्तक रोशनी मांडे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ हर्षदा देशमुख,जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर यांचे हस्ते उत्कृष्ट गटप्रवर्तक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ ज्ञानेश्वर ससे,जिल्हा मूल्यांकन अधिकारी अविनाश जाधव,जिल्हा समूह संघटक अनिल उंदरे,तालुका समूह संघटक महेश रोडगे व जिल्ह्यातील गतप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment