तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 March 2019

धनंजय मुंडे यांचा कार्यक्षम आमदार पुरस्काराने नाशिकमध्ये गौरव


धनंजय मुंडे यांनी स्वतः स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले - खा. शरदचंद्रजी पवार यांचे गौरोदगार

पवार साहेबांनी पाठीवर थाप टाकली म्हणून कर्तृत्व दाखवता आले - धनंजय मुंडे

पुरस्काराच्या रक्कमेसह एक लाख रुपये शहीद निनाद मांडवगणेच्या मुलीला देण्याची घोषणा

नाशिक (प्रतिनिधी) :- दि 04 मार्च .................
धनंजय मुंडे हे सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले नेते आहेत. त्यांच्या जीवनात सततचा संघर्ष आहे मात्र त्यांनी संघर्षाला तोंड दिले त्यांनी कधी संघर्ष सोडला नाही. विधिमंडळात आपले स्थान कायम ठेवले. विरोधी पक्षनेता असताना फक्त सत्ताधार्‍यांवर टीका करायची नसते. लोकांचे प्रश्न मांडायचे, त्या प्रश्नांची सोडवणूक करायची ही विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी असते. विरोधी पक्षनेतापद हे एक हत्यार असते त्याचा वापर प्रभावीपणे करायचा असतो. धनंजय मुंडे त्याचा योग्य पद्धतीने वापर करत आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांनी आज धनंजय मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला.

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या वतीने  कै.माधवराव लिमये स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा  कार्यक्षम आमदार पुरस्कार आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते धनंजय मुंडे यांना देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री श्री.छगन भुजबळ हे हि उपस्थित होते.

  काम करत असताना विरोध होतच असतो मात्र त्याची काळजी करायची नसते. एकदा दुबईला कार्यक्रमानिमित्त गेलो असता मला दाऊदचा मित्र म्हणून संबोधले गेले. मी काही विरोध केला नाही आपले काम प्रामाणिकपणे चालू ठेवा असा सल्ला श्री पवार यांनी मुंडे यांना दिला.

इंदिरा गांधी यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी सभागृहात त्यांची दुर्गा म्हणून स्तुती केली होती. ही राजकीय सभ्यता आताच्या भाजपच्या लोकांमध्ये कधी येणार ते ठाऊक नाही अशी टीका ही त्यांनी केली.

पुरस्कार साहेबांना समर्पित- धनंजय मुंडे

आपण खुशाल म्हणतो की पाठीवरती थाप मारूनी फक्त लढ म्हणा, मात्र कधी माझ्या पाठीवर थाप पडली नाही. आदरणीय शरद पवार साहेबांनी जबाबदारी देऊन पाठीवर थाप दिली म्हणूनच मला कर्तृत्व दाखवता आले अशा शब्दात पवार साहेबांबद्दल कृतज्ञता दाखवत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज त्यांना मिळालेल्या पुरस्कार पवार साहेबांना समर्पित केला.

पुरस्काराची रक्कम मांडगवणे कुटुंबियांना

 पुरस्कार म्हणून मिळालेले 51 हजार रुपये व त्यात आणखी 51 हजार टाकून ते नाशिकच्या शहीद निनाद मांडवगणे यांच्या कन्येला देत असल्याचे त्यांनी जाहिर केले. त्याच बरोबर वाचनालयालाही त्यांनी  51 हजार रूपये देणगी जाहिर केली.

संघर्ष माझ्या पाचवीला पुजलेला

संघर्ष माझ्या पाचवीला पुजला गेला आहे. त्यामुळे सभागृहाच्या आत सभागृहाच्या बाहेर संघर्ष करत राहिलो. सरकार निर्णय करेल नाही तर नाही करणार मात्र लोकांचे प्रश्न हे सभागृहात मांडणे गरजेचे आहे कारण लोकांची नाळ जोडली जाते हे मी गेल्या चार वर्षात शिकलो. सरकार जेव्हा लोकांच्या प्रश्नांवर निर्णय घेते तेव्हा तो विजय विरोधी पक्षाचे असतो असे मुंडे म्हणाले.

पंच पक्षपाती म्हणुन विकेट गेल्या नाहीत

मी 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले मात्र एकाही मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही. आमचा अंपायरच इमानदार नव्हता, हा पुरस्कार घेताना खंत वाटते की आम्ही विकेट घेतल्या होत्या पण त्या दिल्या नाही असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. हे सरकार कितीही जाडजूड असले तरी कसे वाकवायचे ते मला चांगले माहिती आहे आणि ते मी वाकवून दाखवून देईल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

अण्णांच्या आठवणीने धनंजय मुंडे भावुक

भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांचे स्मरण केले तसेच हा क्षण पाहन्यासाठी वडील अण्णा हवे होते हे सांगताना ते भावनीक झाले होते.

यावेळी निवड समिती सदस्य आ.हेमंत टकले यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास अध्यक्ष श्री.विलास औरंगाबादकर, देणगीदार डॉ.विनायक निर्लेकर, सौ.शोभाताई निर्लेकर, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, संचालक किशोर पाठक, धर्माजी बोडके, सचिव श्रीकांत बेणी, संपादक महाराष्ट्र टाईम्स शैलेंद्र तनपुरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार अपूर्व हिरे, जयवंत जाधव,  संचालक देवदत्त जोशी, जयप्रकाश जानेगावकर, वसंतराव खैरनार, संजय करंजकर, अभिजीत बगदे, भानुदास शौभे, बी.जी.वाघ, शंकरराव बोर्हाडे, शंकरराव बर्वे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास नागरिक, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment