तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

समाजशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग व महिला समितीच्या वतीने आज ८आॅक्टो.रोजी जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ वसंत सातपुते होते.
 शहरातील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने  महिला दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते, प्रमुख पाहूणे म्हणून डाॅ.मुक्ता सोमवंशी, डाॅ.वनिता कुलकर्णी या ऊपस्थित होत्या. प्रमुख ऊपस्थितीत प्राचार्या शेख शकिला, प्रा.आरती बोबडे, प्रा.सोळंके मॅडम हजर होत्या. याप्रसंगी महिलांच्या कार्यकर्तृत्त्वावर प्रकाश टाकणारी भित्तीपत्रके प्रकाशित करण्यात आली.
 अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य सातपुते म्हणाले की 'जोपर्यंत स्त्रियांचा सन्मान कुटुंबात होत नाही तो पर्यंत स्त्रीपुरूष समानता ख-या अर्थाने समाजात रूजणार नाही'.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.गिता जोगदंड यांनी केले, प्रास्ताविक डाॅ.सुनिता टेंगसे यांनी, तर आभार  सचिन बोडके यांने मानले. कार्यक्रमास तिन्ही शाखेच्या भरपूर विद्यार्थी विद्यार्थिनींनी हजेरी लावली. राष्ट्रगिताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment