तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

बॉटनी ऑनलाइन क्विझ-२०१९ चे निकाल जाहीर


सोनपेठ : येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बॉटनी ऑनलाइन क्विझ- २०१९ चे निकाल नुकतेच जाहीर झाले असून यामध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या विविध विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात, त्याचाच एक भाग म्हणून वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ऑनलाइन क्विझचे आयोजन केले होते. या परिक्षेत जी. जी. डी. एस. डी. कॉलेज चंंदीगड येथील यतीन सनेजा याने ५६.२५ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तर भवन्स कॉलेज अंधेरी पश्चिम येथील ललीत गुरव याने ५१ गुण घेऊन द्वितिय क्रमांक मिळालेला आहे केकेएम महाविद्यालय मानवतचा जाधव राधाकिशन वसंत तृतीय आला असून त्याने ४७ गुण  मिळविलेले आहेत. 
अशा प्रकारची ऑनलाइन परीक्षा आयोजित करणारे हे कदाचित पहिले महाविद्यालय असून  या परीक्षेसाठी सुमारे ३२५विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती त्यापैकी १६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
याप्रसंगी आपले मत सांगत असताना या परिक्षेचे आयोजक प्रा.डॉ. मुकुंदराज पाटील यांनी सांगितले की हि परिक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग नोंदवता आला. क्वीझला यशस्वी बनविण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले या स्पर्धेतील सहभागीतांचे प्रमाणपत्र व विजेत्यांचे पारितोषिक हे त्यांना ऑनलाइन पद्धतीनेच पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिले.  सर्व पारितोषिक विजेत्यांचे व यशस्वीपणे ही क्वीझ राबवल्यामुळे प्रा. डॉ.मुकुंदराज पाटील प्रा. विशाल राठोड प्रा. महालिंग मेहत्रे, प्रा. नागनाथ दहीफळे यांचे संस्थाअध्यक्ष परमेश्वर कदम प्राचार्य डॉ. वसंत सातपूते व सर्व सहकारी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment