तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

पैहलवान मुरलीधर मुंडे यांच्या माध्यमातून परळीच्या कुस्ती क्षेत्राला नावलौकिक प्राप्त होणार!मावळत्या मातीतल्या खेळाला मुरलीधर मुंडे यांच्या माध्यमातून मिळाली नवसंजीवनी


               परळी वैजनाथ तालुक्यातील कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या संघटनाच्या कामातून नवी ओळख निर्माण केलेला युवक म्हणजे पैहलवान मुरलीधर मुंडे होय. मुरलीधर मुंडे यांनी अतिशय अल्पावधीमध्ये परळी तालुक्यातील कुस्ती क्षेत्रात आपला वेगळा बाणा जपत या क्षेत्राला वैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न सुरू असुन सामाजिक कामांमध्ये ते नेहमीच पुढे रहात आले आहे. तालुक्यातील क्रीडापटूंचे संघटन करून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम प्रामाणिक पणाने करण्याची त्यांची धडपड नेहमी दिसून दिसुन आली आहे.
      स्वतः चांगले कुस्तीपटू असलेले मुरलीधर मुंडे यांनी परळी तालुक्यातील कुस्तीचे पारंपारिक वैभव जपण्याचा व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला निश्चितच यश येताना दिसत आहे. अतिशय तळमळीने कुस्ती क्षेत्रासाठी ते काम करीत असुन अनेकदा हे सिध्द झाले आहे. मुरलीधर भागवतराव मुंडे हे तळेगाव येथील रहिवाशी असून वकिलीचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. शिक्षित व सामाजिक कार्याची जोड असलेला हा युवक कुस्तीसाठी तळमळीने प्रयत्न  करताना दिसून येतो.  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. केवळ कुस्ती क्षेत्रात स्वतःला बंदिस्त करून न घेता सामाजिक जडणघडणीच्या दृष्टीने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. तसेच हनुमान जयंती निमित्त दरवर्षी  स्वतः कुस्तीफडाचे आयोजन ते करीत आले असुन  या माध्यमातून तरूणांना एकत्र आणून व  परळी शहरामधून भव्य मोटारसायकल रँली काढून तळेगाव येथे सांगता करीत आले आहे, तसेच गावकरी व मित्र परिवाराच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी केल्या आहेत.
 दरम्यान त्यांना अनेक पुरस्काराने देखील गौरविण्यात आले असुन मुंबई येथे राज्यस्तरीय एकता पुरस्कार प्रदान , परभणी येथे क्रीडारत्न नागरी राज्यस्तरीय पुरस्कार महात्मा फुले शिक्षण परिषदेच्या त्यांना मिळाला आहे.
           श्री.संत भगवान बाबा व्यायाम शाळेची स्थापना करून येणाऱ्या पिढ्यांना व्यायामाची सुविधा व जाणीव करून देण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत असुन  जय हिंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून गाव व परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यामध्ये ते नेहमीच पुढे असतात. केवळ क्रीडा व सामाजिक कार्याने युवक स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही याचा आदर्श घालून देत त्यांनी तळेगाव येथे स्वतः तुळजाभवानी दूध संकलन केंद्र सुरू करून युवकांच्या सर्वांगीण  विकासात व्यावसायिक जोड किती महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले असुन  आतापर्यंत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये गावामध्ये राबवलेला एकता सत्कार सोहळा असो की  विविध स्पर्धा घेणे  या माध्यमातून त्यांनी युवकांनी अनेकानेक व्यासपीठ निर्माण करून दिले आहेत.      
         व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांचे चांगले काम असून वेळोवेळी व्यसनमुक्ती शिबिरांचे आयोजन करून व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचे काम करतात. त्याचबरोबर मुक्या  जनावरांसाठी ते काम करतात.  आपण शेतकऱ्यांची मुले आहोत आणि जनावरे ही आपले वैभव आहे. हे लक्षात घेऊन त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीनेही वारंवार जनावरांचे लसीकरण शिबिर त्यांनी आयोजित केलेले आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी ते अग्रेसर असतात. स्वतः दुग्धव्यवसायामध्ये युवकांना आकर्षित करून अधिकाधिक जागृती करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न दिसून येतो.
   परळी तालुका व शहरातील खिळांडू व कुस्ती क्षेत्रातील प्रेमींना एकत्र आणुन  त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सतत प्रयत्न करीत आले आहे.
          पैहलवान मुरलीधर मुंडे यांनी आपल्या सक्रिय कामातून युवकांपुढे एक आदर्श निर्माण असुन त्यांच्या माध्यमातून कुस्तीच्या  क्षेत्रात परळीचा निश्चितच नावलौकिक होईल अशी अपेक्षा आहे.  या युवकाला त्याच्या कार्यात उत्तरोत्तर यश मिळावे अशीच परळी तालुक्यात जनभावना निर्माण झालेली आहे. पैहलवान मुरलीधर मुंडे यांचा आज वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसाच्या निमिताने उदंड आयुष्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व येणाऱ्या काळात त्यांच्या हातून असेच कुस्तीक्षेत्रातील कार्य घडत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
                   शुभेच्छुक
                  महादेव गित्ते
उपाध्यक्ष, पत्रकार संघ, परळी वैजनाथ

No comments:

Post a Comment