तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

वंचित बहुजन आघाडीचा जिल्ह्यात झंजावात -डॉ. नितीन सोनवणे

बीड,दि.१५ (प्रतिनिधी) :- आदरणीय ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली वंचित बहुजन आघाडी लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांध्ये निश्चित बदल करणार आहे. या बदलामुळे घराणेशाहीची  राजवट मुळासकट नेस्तनाबूत होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे, असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे महासचिव  डॉ.नितीन सोनवणे यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली आहे.

     प्रसिद्धीस  दिलेल्या पत्रकात डॉ.नितीन सोनवणे यांनी म्हंटले आहे की, बीड लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. विष्णू जाधव हे लढवीत आहेत. बीडच्या घराणेशाहीला संपविण्यासाठी वंचित बहुजनांनी आता एकवटले पाहिजे. त्याकरिता आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत मतांचा कौल दिला पाहिजे, ही आपली आता नैतिक जबाबदारी आहे. बीड लोकसभेच्या अनुषंगाने जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात सुरु आहे. या झंजावाताला वंचित बहुजन समाज बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुठल्याही परिस्थिती या राज्यात आपल्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांना मिळून बाळासाहेबांना सत्तेच्या चाव्या द्यायच्या आहेत, आणि ह्या चाव्या आपले बहुमूल्य मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना देऊन द्यायच्या आहेत.कारण त्याशिवाय   आता पर्याय नाही. एकमेव आदरणीय प्रकाश आंबेडकर हेच वंचित बहुजन समाजाचे सर्व प्रश्न सोडवू शकतात अन्य दुसरे कुठलेही सरकार सोडवू शकत नाही. त्यामुळे त्याच्या पाठीशी  खंबीरपणे उभा रहा असे आवाहनही वंचित बहुजन आघाडीचे महासचिव डॉ. नितीन सोनवणे यांनी प्रसिद्धिपत्रकातू केले आहे.

No comments:

Post a Comment