तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 March 2019

पाथरीत रोमहर्षक कबड्डीचा थरार;गंगाखेडचा आनंदवनचा संघ अजिंक्य

प्रतिनिधी
पाथरी:-५०किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण १२ संघानी सहभाग नोंदवला. अंतिम सामना खुपच रोमहर्षक झाला. अंतिम सामन्यात आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड व राजे शिवाजी क्रीडा मंडळ कोल्हा यांच्यात झाला. हा सामना शेवटपर्यंत कोणाच्या पारड्यात पडेल हे सांगता येत नव्हते. शेवटचा एक मीनिट बाकी असतांना गंगाखेड- १२ आणि कोल्हा- १३ अशी गुणसंख्या असतांना शेवटची क्षणाला गंगाखेडच्या  अभय  मादाळे यांनी आक्रमक चढाई करून आपल्या संघाला एक मिळवुन सामना बरोबरीत आणला...नियमानुसार पाच पाच चढाया मध्ये आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड च्या संघाने राजे शिवाजी कोल्हा संघावर एका गुणांची मात करून अजिंक्यपद पटकावले. 
स्पर्धेत उत्कृष्ट चढाई खेळाडू गंगाखेड च्या अभय मादाळे.
सर्वोत्कृष्ट पकड गणेश बोबडे.
तर राजे शिवाजी कोल्हा चा तुफानी रायडर विठ्ठल देशमुख हा मॅन ऑफ दि मॅच मानकरी ठरला.
स्पर्धेचा निकाल-
प्रथम- आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड 
द्वितीय- राजे शिवाजी क्रीडा मंडळ कोल्हा,तृतीय- मानवत स्पोर्टस् अॅकडमी ,तृतीय- मानवत स्पोर्टस् अॅकडमी 
युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र परभणी च्या वतिने पाथरी येथील साई क्रिडा मंडळ व व्यायम शाळेच्या कब्बडी महर्षी स्व बुवा साहेब साळवी क्रिडा मैदानावर रविवार २७ मार्च रोजी जिल्हा स्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिध्द बालरोग तज्ञ डॉ जगदिश शिंदे हे उपस्थित होते तर या कब्बडी स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य कब्बडी असोशियशन चे कोषाध्यक्ष मंगल पांडे यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदिप तिडके, पत्रकार किरण घुंबरे पाटील, बाबासाहेब गर्जे, माणिकराव केंद्रे, शैलेश शामकुवर, धनंजय आडसकर, नवनाथ देशमुख, अतिष गरड, भारत धनले, नितिन जाधव,  चव्हाण यांची या वेळी उपस्थिती होती.या वेळी मंगल पांडे ,डॉ जगदिश शिंदे,पत्रकार किरण घुंबरे पाटील,भारत धनले, यांनी मनोगत व्यक्त करत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे समन्वयक संदिप तिडके यांनी केले तर सुत्र संचलन क्रिडा शिक्षक तुकाराम शेळके आणि आभार नेहरू युवा क मानले. जिल्ह्यातील विविध मंडळांचे पन्नास किलो गटातील विविध संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते..

No comments:

Post a Comment