तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

केंंद्र सरकार विविध विषयांचे भांडवल व पोकळ घोषणा करून जनतेची सहानभुती घेण्याचा डाव जनता हाणुन पाडणार - - के.डी. उपाडे
महादेव गित्ते
------------------------------^
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
केंद्रातील मोदी सरकारची 4 वर्षे 9 महीन्याची कारर्कीद हि जनतेच्या मनातील असंतोष, चिड, अन्याय ईत्यादीनी बरबटलेली आहे. या काळात कामगार बेरोजगार ,शेत मजूर, अल्पपेन्शनधारक व सामान्य जनता वेटाकुटीला आली आहे. विविध योजनेतून पौसे गोळाकरणे हा एकमेव धंदा सुरु आहे. केंद्र सरकारला जनते समोर येऊन आपल्या काळातील केलेल्या कार्याची माहिती देणे सुद्धा अवघड झाले आहे. जनते समोर येऊन तोंड दाखवणे सुद्धा मुश्किल      झाले आहे. नोटा बंदी, जी.एस.टी. महागाई भांडवलदाराचे  पालन, दररोज वेगवेगळ्या फेकु बातम्या देणे,  सोंगाळ्याचे सांेग घेणे, अशा या नाटकी कारभाराला जनता कंठाळलेली आहे. असे असंवेदनशिल सरकार विविध विषयाचे भांडवल व पोकळ घोषणा करुन जनतेची सहानभुती घेण्याचा डाव रचत आहे. जनताच तो डाव हाणून पाडणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रावादी काँग्रेस ज्येष्ठ नागरीक सेलचे शहर अध्यक्ष के.डी.उपाडे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयाच्या आयोजित बौठकीत उपाडे बोलत होते. यावेळी अशोक शेप, एस.के.गित्ते, अरुण जोशी, डी.एम.मुगळीकर, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीला बळ देण्याचे आवाहान केले. सर्वश्री. ज्ञानोबा झाटे, रमेश वाल्मिकी, सय्यद रशिद, शंकर राऊत, वौजनाथ पवार, आर.डी. पंचाळ ईत्यादी पदाधिकारी उपास्थित होते. बौठकीचे सुत्र संचलन व आभार सेल चे चिटणीस श्रीहरी कवडेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment