तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

प्रितमताईन बहुमतेती विजय करेसारू ” ची ग्वाही देत राष्ट्रवादीचे असंख्य बंजारा कार्यकर्ते भाजपात


ना. पंकजाताई मुंडे यांनी स्वागत करून दिले विकासाचे वचन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 30….
” प्रितमताईन बहुमतेती विजय करेसारू” म्हणजे प्रितमताई यांना आम्ही प्रचंड मताधिक्य देऊ अशी ग्वाही देत वसंतनगरच्या असंख्य बंजारा कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला. पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत करून तांड्याचा सर्वांगीण विकास करण्याचे वचन दिले. ना. पंकजाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन बंजारा कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
ना. पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच विकासाची दृष्टी आहे त्यांनी बंजारा समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. तर तांड्या तांड्यावर रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे. राष्ट्रवादी पक्षाने केवळ मतांसाठी आमचा वापर केला मात्र विकास केला नाही असा आरोप करीत आम्हाला न्याय देण्याची क्षमता केवळ ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मध्येच आहे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आम्ही भाजपात प्रवेश करीत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन विजय राठोड, वकील राठोड, बबन चव्हाण, रेणू चव्हाण, कृष्णा राठोड, दशरथ राठोड, सुखदेव चव्हाण, संजय राठोड, विनोद राठोड, संतोष राठोड, पपन राठोड, संजय जाधव, अजय राठोड, रामेश्वर राठोड, दत्ता राठोड, बाबा महाराज वसंतनगरकर, प्रेमदास राठोड, अविनाश भैय्या जाधव आदी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यशश्री निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून पक्षात प्रवेश दिला. यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, सर्व तांड्यासह वाडी वस्तीच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आम्ही कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीसाठी वापर करीत नाहीत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर बंजारा समाजाने खुप प्रेम दिले, त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालवत असुन कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा वसा आम्ही साहेबांकडून घेतला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून काम करा मी वीकासासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
आम्ही खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी विमलबाई जाधव, सचिन गित्ते, पप्पू चव्हाण, वसंत राठोड, संतोष राठोड, विलास राठोड, रमेश राठोड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment